खरंच फटाके बंदी ठरेल फायद्याची?


दिवाळी म्हंटलं की सगळीकडे आनंदमय वातावरण. दिव्यांच्या रोषणाईसह फराळाचा तिखट-गोड आस्वाद. पण त्यासोबतच लगबग असते ती लहानग्यांच्या फटाके फोडण्याच्या उत्साहाची. यावर्षीची दिवाळी मात्र जरा निराळीच... जगभरात धुमशान घातलेल्या कोरोना व्हायरसने तर लोकांना धडकीच भरली आहे. त्यामुळे यंदा फटाक्यांची दिवाळी नाही तर साजरी करुया दिव्यांची दिवाळी !

थंडीच्या दिवसात फटाक्यांच्या प्रदुषणामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका असल्याने यंदा फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. खरं तर कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सरकारने हा निर्णय घेतला तो योग्यच म्हणावा लागेल. फटाक्यांमुळे होणाऱ्या वायुप्रदुशनाने कोरोनाची भिती वाढण्याची शक्याता अधिक आहे. त्यामुळे सावधगिरी बाळगणे हेच उत्तम... काही जण फटाक्यांसह आनंद साजरा करण्यास पसंती देतात तर काहींना ही हानीकारक परंपरा असल्याचे वाटते. तुम्हाला माहीती असेल फटाके जाळण्याने नुकसान होते पण कधी हा विचार केलाय का फटाक्यांचा ही होतो फायदा.



फटाके फोडने म्हणजे परिणानामी वायुप्रदुशनात भर, पण फटाके जाळण्यामुळे बर्‍याच उष्णतेचे उत्पादन होते जे इतर मार्गांनी हानिकारक असू शकते यामुळे डासांचा नाश होतो. त्याचप्रमाणे अत्यंत हानिकारक रोग पसरविण्यास प्रतिबंध करते. अती प्रमाणात लाइट्स आणि हीटिंग इफेक्ट डासांसाठी असहाय्य आहे आणि या प्रक्रियेत त्यांचा मृत्यू होतो. त्याचबरोबर अनेकांच्या मते फटाके जाळणे हे एक प्रदुशनास प्रमुख कारण आहे. अहो पण तुम्हाला हे माहिती आहे का फटाके जाळण्याचा जगातील प्रदूषणामध्ये केवळ 0.03% वाटा आहे. त्यामुळे जर आनंद साजरा करण्यासाठी थोड्या प्रमाणात फटाके उडवले तर काय हरकत आहे ? त्याचबरोबर फटाके फोडण्याचा आनंद मिळतो तो काही वेगळाच असतो, हो ना?

हे तर झाले फटाके फोडण्याचे फायदे, पण त्यासोबत तुम्ही हे विसरु नका, फटाके फोडण्याचे नुकसान हे फायद्यापेक्षा जास्त धोकादायक आहे. यामुळे वायप्रदुशन, ध्वनीप्रदुशन तर होतेच पण त्यासोबतच हा आनंद उपभोगल्यानंतर उरलेल्या फटाक्यांच्या कचऱ्याचे काय? ही एक मोठी समस्या आहे. त्या कचऱ्यातील रसायन कल्पनेपेक्षा जास्त घातक ठरु शकते. तसेच आनंदासोबत फटाके जाळणे हे अत्यंत धोकादायकही आहे. कपड्यांमुळे फटाक्यांद्वारे सगज आग लागू शकते आणि दिवाळी दरम्यान अपघातांचे मुख्य कारण फटाके असतात. त्यामुळे यंदाची दिवाळी ही साजरी करुयात फटाकेमुक्त दिवाळी….

 

 

 

Comments

Popular posts from this blog

Editor's Pick: Top stories for 31 March'17

Editor's Pick: Top stories on 13th April in a capsule

क्रिकेट प्रेमियों के लिए अच्छी खबर, भारत और साउथ अफ्रीका की टीम जल्द हो सकती है आमने-सामने