९ ऑक्टोबरच्या ठळक बातम्या थोडक्यात
गोध्रा हत्याकांडातील आरोपींना दिलासा गुजरात हायकोर्टाने सोमवारी २००२ मध्ये झालेल्या गोध्रा हत्याकांड प्रकरणावर निर्णय दिला . कोर्टाने २०११ मध्ये आलेल्या एसआयटी कोर्टाचा निर्णय बदलून ११ दोषींची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली आहे . तर २० दोषींची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आहे . त्यासोबतच कोर्टाने पीडित कुटुंबियांना १० - १० लाख रूपये नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले आहेत . २७ फेब्रुवारी २००२ ला साबरमती एक्सप्रेसच्या एस - ६ डब्याचे दोन्ही दरवजे बंद करून संपूर्ण डब्याला गोध्रा स्टेशनवर आग लावण्यात आली होती . त्यानंतर संपूर्ण गुजरातमध्ये दंगे भडकले होते . या डब्यात ५९ लोक होते . ज्यातील अनेक लोक हे अयोध्यावरून परत येणारे ‘ करसेवक ’ होते . एसआयटीच्या विशेष न्यायालयाने १ मार्च २०११ ला याप्रकरणी ३१ लोकांना दोषी ठरवले होते . तर ६३ लोकांना निर्दोष सोडले होते . त्यातील ११ दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती आणि २० दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती . एसआ...