९ ऑक्टोबरच्या ठळक बातम्या थोडक्यात

गोध्रा हत्याकांडातील आरोपींना दिलासा


गुजरात हायकोर्टाने सोमवारी २००२ मध्ये झालेल्या गोध्रा हत्याकांड प्रकरणावर निर्णय दिला. कोर्टाने २०११ मध्ये आलेल्या एसआयटी कोर्टाचा निर्णय बदलून ११ दोषींची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली आहे. तर २० दोषींची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आहे. त्यासोबतच कोर्टाने पीडित कुटुंबियांना १०-१० लाख रूपये नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले आहेत. २७ फेब्रुवारी २००२ ला साबरमती एक्सप्रेसच्या एस- डब्याचे दोन्ही दरवजे बंद करून संपूर्ण डब्याला गोध्रा स्टेशनवर आग लावण्यात आली होती. त्यानंतर संपूर्ण गुजरातमध्ये दंगे भडकले होते. या डब्यात ५९ लोक होते. ज्यातील अनेक लोक हे अयोध्यावरून परत येणारेकरसेवकहोते. एसआयटीच्या विशेष न्यायालयाने मार्च २०११ ला याप्रकरणी ३१ लोकांना दोषी ठरवले होते. तर ६३ लोकांना निर्दोष सोडले होते. त्यातील ११ दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती आणि २० दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. एसआयटी कोर्टाने दोषी ठरविलेल्या आरोपींच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. तर, ६३ लोकांना निर्दोष ठरविण्याच्या निर्णयाला राज्य सरकारने आव्हान दिले होते.
___________________________________________

यंदा दिल्लीतली दिवाळी बिना फटाक्यांची

देशाच्या राजधानीमध्ये दिवसेन दिवस वाढत असणाऱ्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर दिवाळीच्या काळात दिल्लीत फटाके विक्रीवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. ३१ ऑक्टोंबर पर्यंतही बंदी घालण्यात आली आहे. यासंबधी सर्वोच्च न्यायालयाने ११ नोव्हेंबर २०१६ रोजी दिल्ली आणि एनसीआर (राजधानी परिक्षेत्र) प्रदेशात फटाके विक्रीवर बंदी घातली होती. यानंतर यावर्षी १२ सप्टेंबर रोजी न्यायालयाने आपला आदेश मागे घेत फटाक्यांवरील बंदी उठवली होती. त्यानंतर अर्जुन गोपाल यांनी याविरोधात जनहित याचिका दाखल केली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार दिवाळीच्यापुर्वी आणि दिवाळीनंतर दिल्लीतले प्रदूषण अतिउच्च पातळीवर पोहचते. त्याचा लोकांच्या आरोग्यावर घातक परिणाम होवू शकतो. या याचिकेनंतर सर्वोच्च न्यायालयाने आपला पूर्वीचा निर्णय कायम ठेवत ३१ ऑक्टोंबर पर्यंत दिल्ली आणि एनसीआर परिसरात फटाके विक्रीवर बंदी घातली आहे. नोव्हेम्बर पासून पुन्हा फटाके विक्री करता येईल. मात्र ज्यांनी आधीच फटाके विकत घेतले असतील ते फटाके फोडू शकतात तसेच दिल्लीच्या बाहेरून फटाके विकत घेऊ शकतात.
____________________________________________

शेतकरी विषबाधा प्रकरणी कृषी केंद्रांवर गुन्हे दाखल

यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशक फवारणीमुळे २० शेतकऱ्याचे हकनाक जीव गेले. ७५० हून अधिक शेतमजुरांना विषबाधा झाली आहे. या मध्ये २० शेतकऱ्यांनी आपले प्राण गमावले आहेत तर २५ शेतकऱ्यांनी दृष्टी गमावली असून इतर शेतकऱ्यांची परिस्थतीतही विकत आहे. कृषी केंद्रांमधून विनापरवानगी हे औषध विकले गेले. ही परवानगी देणारे आणि औषध विक्रीची तपासणी करण्याची जबाबदारी असलेल्या कृषी विभागाचे अधिकाऱ्यांवर अद्याप कारवाई झालेली नसली तरी अनधिकृतपणे कीटकनाशकाची विक्री केल्या प्रकरणी यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत कृषी केंद्र चालकांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. गुन्हे नोंदवीण्यात आलेल्या एकूण कृषी केंद्रांपैकी दोघांवर दोघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पहिल्यांदाच गुजरातच्या कीटकनाशक कंपनी विरुद्ध देखील गुन्हा दाखल झाला. मुकुटबन येथे गुजरातमधील यूपीएल कंपनीचे व्यवस्थापक आणि आनंद कृषी केंद्र चालक सुरेंद्र तातेड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे.
________________________________________________

देशभरात मालवाहतूकदारांचा संप

सोमवार आणि मंगळवारी देशभरात मालवाहतूकदारांचा संप आहे. ऑल इंडिया मोटर वाहतूक काँग्रेसनं हा संप पुकारलाय. देशभरातील ९३ लाख वाहतूकदार यात सामील होणार आहेत, राज्यातील १५ लाख तर मुंबईतील जवळपास लाख वाहतूकदार यात सहभागी होतील असा दावा संपकऱ्यांनी केला आहे. डीझेल-पेट्रोलला जीएसटी क्षेत्रात घ्यावे अशी मागणीही होत आहे. देशभरात सुमारे ९३ लाख ट्रक एआयएमसीसी बॅनरखाली या बंद मध्ये सहभागी झाल्याने ते रस्त्यावर दिसणार नाहीत. आणि १० ऑक्टोबर रोजी चक्काजाम करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट कॉंग्रेसचे अध्यक्ष एस. के. मित्तल यांनी पत्रकारांना सांगितले. मात्र हाथरस पार्कचुन ट्रान्सपोर्ट आणि मिनी ट्रक ट्रान्सपोर्ट असोसिएशनने या स्ट्राइकला विरोध केला आहे. ते केवळ एक काळी पट्टी बांधून काम करणार आहेत. अशाप्रकारे आंदोलन करुन एका दिवसात साधारण सव्वा कोटी रुपयांच्या टर्नओव्हरवर परिणाम होईल असे संघटनेचे अध्यक्ष किशन लाल यांनी सांगितले.
________________________________________________

मुंबईतील बुचर बेटावरील आग अखेर विजली

मुंबईतल्या भाऊचा धक्का परिसरात असलेल्या बुचर आयलँडला शुक्रवारी संध्याकाळी .३० वाजता आग लागली होती. धुमसणार्या या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी गेले दोन दिवस जावान झटत आहेत. या भीषण आगीमुळे तेलाच्या टाक्या समुद्राच्या दिशेने झुकल्या आहेत. मात्र अखेर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. टाक्यांवर आग पसरु नये यासाठी सुरक्षिततेचे उपाय करण्यात येत आहेत. खबरदारी म्हणून फोम कुलिंगही सुरु आहे. ही पूर्णपणे आग विझवण्यासाठी आणखी काही तास लागण्याची शक्यता आहे. सुरक्षेच्या कारणास्तव इथे डिझेल आणि पेट्रोल घेऊन जाणा-या सर्व जहाजांना हलवण्यात आले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी बीपीटीसह मुंबई अग्निशमन दलाचे जवान शुक्रवारपासून झटत आहेत. ही आग पूर्णपणे विझली असल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आली आहे. या आगीत  सुमारे 235 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.



Popular posts from this blog

जिओ कॅप्सूल : ५ मिनटात वाचा ठळक बातम्या थोडक्यात

Top stories on 23rd October in a capsule