Posts

Showing posts with the label थंडी

जिओ कॅप्सूल : ५ मिनटात वाचा ठळक बातम्या थोडक्यात

Image
चित्रपटगृहांत राष्ट्रगीत सक्‍ती नाही : सर्वोच्च न्यायालय गत काही काळापासून चित्रपटगृहांतील राष्‍ट्रगीत सक्‍तीवरून सुरू असणारे द्वंद्व आता थांबणार आहे. सर्वोच्‍च न्यायालयाने केंद्र सरकाच्या विनंतीनुसार आपला राष्‍ट्रगीत सक्‍तीचा निर्णय मागे घेतला आहे. याबाबत झालेल्या आजच्या सुनावणीत सर्वोच्‍च न्यायालयाने हा निकाल दिला. दरम्यान , तत्कालीन सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी नोव्हेंबर २०१६ रोजी चित्रपटगृहांत चित्रपट सुरू होण्याआधी राष्ट्रगीत गायनाची सक्ती केली होती. तर ऑक्टोबर २०१७ रोजी तत्कालीन न्या. डी. वाय. चंद्रचूड यांनी राष्ट्रगीत गायनावेळी उभे राहण्याची प्रेक्षकांवर सक्ती करता येणार नसल्याचे मत नोंदविले होते. लोकांवर नैतिक धोरणांची सक्ती करणे उचित नाही. उभे राहिल्याने राष्ट्रभक्ती सिद्ध झाली , असे म्हणणे तर्कसंगत नसल्याचेही चंद्रचूड यांनी केंद्र सरकारला नव्याने परिपत्रक जारी करण्याचे आदेश दिले होते. या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने हा आदेश मागे घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने हा निकाल दिला आहे. _____________________________ महाराष...

जिओ कॅप्सूल : ५ मिनटात वाचा ठळक बातम्या थोडक्यात

Image
अखेर तिहेरी तलाक प्रतिबंधक विधेयक लोकसभेत सादर सर्वोच्च न्यायालयाने तिहेरी तलाक बेकायदेशीर आणि घटनाबाह्य ठरवल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने याबाबतचे विधेयक गुरुवारी लोकसभेत सादर केले. केंद्रीय कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी हे विधेयक सादर करण्याआधीच काही सदस्यांनी याला विरोध केला. तिहेरी तलाक बेकायदेशीर ठरवणाऱ्या आणि पीडितेला न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार देणारे हे विधेयक कोणत्याही पक्षाचे नसून महिलांच्या सन्मानासाठी असल्याचे प्रसाद यांनी स्पष्ट केले. तसेच मुस्लिम महिलांना नक्की कसा फायदा होईल , याबाबत विधेयकात कोणताही उल्लेख नाही. तसेच कायद्याचे उल्लंघन केलेल्या पतीला शिक्षा झाल्यानंतर त्या कुटुंबीयांची काळजी कोण घेणार याचा विचार करण्यात आलेला नाही , अस विरोध काँग्रेसने दर्शविला आहे. ___________________________ विदर्भ , मराठवाडा पुढील ४८ तासात थंडीची लाट विदर्भ , मराठवाडा काही भागात पुढील ४८  तासात थंडी लाट असण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेने वर्तविली आहे. गेल्या ४८  तासांपासून विदर्भात थंडीची लाट असून गुरुवारी रात्री  गोंदीयात निच्...