Posts

Showing posts with the label देवेंद्र फडणवीस

जिओ कॅप्सूल : ५ मिनटात वाचा ठळक बातम्या थोडक्यात

Image
अर्थसंकल्पातून करण्यात आला नवभारताच्या निर्मितीचा संकल्प : फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प हा अभूतपूर्व आणि ऐतिहासिक असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ‘सबका साथ-सबका विकास’ ही संकल्पना या अर्थसंकल्पामुळे आणखी विस्तारित झाली आहे. नवभारताच्या निर्मितीचा संकल्प सर्वसमावेशक असलेल्या या अर्थसंकल्पातून करण्यात आला असून त्यातून शेतकरी, गरीब, महिला,युवक, मागासवर्गीय आणि ज्येष्ठ नागरिक अशा विविध घटकांना न्याय देण्यात आला आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ________________________ निराशा करणारा अर्थसंकल्प : अशोक चव्हाण केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी लोकसभेत सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे स्वप्नांची मालिका आणि घोषणांचा पाऊस आहे. अशी टीका काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे. अर्थसंकल्‍पावर बोलताना अशोक चव्हाण यांनी या अर्थसंकल्‍पामध्ये अंमलबजावणीचा रोडमॅप दिसत नसल्‍याचे म्‍हंटले आहे. तसेच मोठमोठे आकडे सांगून प्रत्यक्षात लोकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे ...

जिओ कॅप्सूल : ५ मिनटात वाचा ठळक बातम्या थोडक्यात

Image
हेलिकॉप्टर अपघातातून चौथ्यांदा बचावले फडणवीस गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हेलिकॉप्टर अपघात टळला. मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर मुंबईजवळील भाईंदरमध्ये लँडिंग करत असताना हा प्रकार घडला. या हेलिकॉप्टरच्या मार्गात केबल आल्याने ते पुन्हा वर घेण्यात आले. सतर्कतेमुळे हा अपघात सुदैवाने टळला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विविध कामांच्या भूमिपूजनासाठी मीरा भाईंदर येथे आले होते. पण त्यावेळी त्यांचे हेलिकॉप्टर केबलमुळे इतरत्र भरकटले आणि इमर्जन्सी लँडिंग करावे लागले असल्याचे सांगितले जात आहे. हेलिकॉप्टरमध्ये त्यांच्या बरोबर नितीन गडकरी देखील होते. देवेंद्र फडणवीस हे चौथ्यांदा अशा प्रकारच्या अपघातातून वाचले आहेत. या पूर्वी 25 मे 2017 रोजी लातूरहून मुंबईकडे येण्यासाठी टेक ऑफ घेतल्यानंकतर काही क्षणातच कोसळलं होतं. 7 जुलै 2017 रोजी अलिबाग येथे हेलिकॉप्टर लँडिंग मार्कच्या पुढे सरकल्यानं मागील पाते मुख्यमंत्र्यांचा डोक्याला लागण्याचा धोका उद्भवला होता. तर 9 डिसेंबर 2017 रोजी नाशीक येथे हेलिकॉप्टरने उड्डाण केल्यानंतर क्षमतेपेक्षा अधिक वजन झाल्याने इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले होते. ...

जिओ कॅप्सूल : ५ मिनटात वाचा ठळक बातम्या थोडक्यात

Image
नवी मुंबई महापालिकेवर आयकर विभागाची धाड  आयकर विभागाच्या नजरेतून शासकीय कार्यालयेसुद्धा वंचित राहिले नसल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. जीएसटीबाबत आयकर विभागाच्या 12 अधिकाऱ्यांनी नवी मुंबई महापालिकेवर धाड टाकली आहे. आयकर विभागानं मंगळवारी सकाळी धाड टाकली होती. ठेकेदारांनी जीएसटी योग्य प्रकारे भरणा केला का याचीही तपासणी करण्यात आली. मंगळवार सकाळ पासून बुधवारी पहाटे पर्यंत तपास सुरू होता. महापालिकेचे मोठे ठेकेदार आणि अधिकारी आयकर विभागाच्या रडारवर असल्याचे समजते. बुधवारी सकाळी महापालिकेच्या अकाउंट्स विभाग , नगररचना विभाग आणि शहर अभियंता विभागावर धाडी घातल्या आहे. यावेळी 100 कोटींच्या वरील कामांच्या सर्व फायलींची तपासणी करण्यात आली. महापालिकेचे मोठे ठेकेदार आणि अधिकारी आयकर विभागाच्या रडारावर आहेत. _____________________ मुख्यमंत्र्यांच्या जीवाला धोका : प्रकाश आंबेडकर संभाजी भिडेंच्या निकटवर्तीयानं मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याचं आव्हान फेसबुकवर केल्याची धक्कादायक माहिती भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एका पत्रकार परिषदेत उघड केली. ...