Posts

Showing posts with the label वांद्रे आग

२६ ऑक्टोबरच्या ठळक बातम्या थोडक्यात

Image
इसिसमध्ये भरती झालेल्या कल्याण मधील तरुणाचा मृत्यू रक्का येथील दहशतवादाविरोधातील कारवाई दरम्यान इस्लामिक स्टेट ( इसिस ) या दहशतवादी संघटनेत भरती झालेल्या कल्याणचा फहाद तन्वीर शेख या तरुण ठार झाला असल्याची ही माहिती फहादच्या कुटुंबियांना निनावी फोनद्वारे देण्यात आली आहे . मंगळवारी परदेशातील मोबाईल क्रमांकावरुन अज्ञात व्यक्तीने फहाद शेखच्या आईला फोन केला . फहादचा सीरियातील रक्का येथे कारवाईदरम्यान मृत्यू झाल्याची माहिती त्या व्यक्तीने दिली . फहादच्या आईला हे ऐकून धक्का बसला . फहादचा कुठे मृत्यू झाला याची माहितीदेखील त्यांनी घेतली नाही , असे फहादच्या नातेवाईकांनी सांगितले . फहादच्या वडिलांनी फोन आल्यानंतर या फोन कॉलविषयी राष्ट्रीय तपास यंत्रणेला ( एनआयए ) माहिती दिली . हा फोन कुठून आला होता , याचा शोध एनआयएचे पथक घेत आहेत . २०१४ मध्ये कल्याणमधील फहाद शेख , अमन तांडेल , सहिम तानकी , आरिफ मजीद हे चार तरुण इसिसमध्ये सामील होण्यासाठी इराकला गेले होते . यातील अमन तांडेल आणि ...