Posts

Showing posts with the label शिवस्मारक

१६ डिसेंबरच्या ठळक घडामोडी थोडक्यात

Image
कॉंग्रेसलाही सावरकरांचा आदर, पण... काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह्य विधानाबाबत देशभरातुन तिव्र प्रतिसाद उमटत आहेत. यावर आता कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, ३० ऑगस्ट १९११ सालाच्या सावरकरांबाबत आम्हाला आदर आहे. पण त्यानंतर सावरकर यांच्या विचारात बदल होत गेले आणि ते बदल आम्हाला मान्य नाहीत. दरम्यान हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी फडणवीसांसह नेते मंडळींनी डोक्यावर भगव्या रंगाची 'मी पण सावरकर' लिखित टोपी घालून विधानभवनात प्रवेश केला. भाजप सावरकरांचा उपयोग हा राजकीय फायद्यासाठी करत असल्याचा आरोप देखील यावेळी सचिन सावंतांनी केला. त्याचबरोबर सावरकरांचे नातू रंजीत यांना त्यांच्याबद्दल काही माहित नसल्याचेही सावंत म्हणाले. *************** शिवस्मारकात भ्रष्टाचार? अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या शिवस्मारकावरुन राजकारणार आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक प्रकरणात चंद्रकांत पाटील यांनी पैसे खाल्ले असा आरोप राष्ट्रवादीचे नेते ...