६ सप्टेंबरच्या ठळक बातम्या थोडक्यात
गोरक्षणाच्या नावाखाली हिंसा नको : न्यायालय देशात गोरक्षणाच्या नावाखाली हिंसा करणाऱ्यावर कडक करवाई करा , असे निर्देश बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारांना दिले . त्याचबरोबर यांसारख्या हिंसेच्या घटनांवर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याची नेमणूक करण्याच्या सूचना राज्य सरकारांना न्यायालयाने दिल्या आहेत . कायदा हातात घेणारे आणि स्वतःलाच कायदा समजणाऱ्यां विरोधात कठोर पावले उचलणे गरजेचे असल्याचे न्यायालयाने म्हटले . या संदर्भात याचिका दाखल करणाऱ्यांनाही न्यायालयाने फटकारले . या विषयाचे राजकारण न करण्याच्या सूचना याचिका कर्त्यांना देण्यात आल्या . तसेच ईद दरम्यान मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या जनावरांच्या कत्तलीविषयीही तुम्ही याचिका दाखल केली पाहिजे , असे न्यायालयाने म्हटले आहे . राज्यभरात गणेश विसर्जन सोहळ्यादरम्यान 15 हून अधिक जणांचा मृत्यू राज्यात एकीकडे गणपती बाप्पांना भावपूर्ण वातावरणात निरोप देत असतानाचा , दुसरीकडे विसर्जन ...