१३ ऑक्टोबरच्या ठळक बातम्या थोडक्यात
मुंबई महापालिकेचे सत्तेचे राजकारण मुंबई महापालिकेत सध्या शिवसेनेची सत्ता असली तरी शिवसेना आणि भाजप यांच्या संख्याबळात केवळ एकचा फरक आहे . भांडूपमधील पोटनिवडणुकीत काल भाजपची नगरसेविका विजयी झाल्यानं भाजपचं संख्याबळ ८३ वर पोहोचले तर सत्ताधारी शिवसेनेचे ८४ नगरसेवक आहेत . त्यामुळं मनसेच्या नगरसेवकांना फोडून , सत्ता टिकवण्याचा आटापिटा शिवसेनेने शुक्रवारी सुरु केला . त्यांनी मनसेच्या ६ नगरसेवकांना गळाला लावले . मात्र भाजपनेही त्यांची ही गेम चांगलीच उलटवली . कोकण भवनातील महापालिकेतील राजकीय पक्षांच्या गटनोंदणीचे काम पाहणाऱ्या दोन्ही अधिकाऱ्यांना तात्काळ मंत्रालयात मिटिंगच्या नावाखाली बोलवून घेतले . यामुळे शिवसेनेने मनसेचे नगरसेवक घेवून येणार असल्याची कल्पना देवूनही प्रादेशिक उपसंचालक , ( नगरपरिषद प्रशासन ) सुधाकर जगताप आणि तहसिलदार राजेश वैष्णव मात्र मुंबईतील मंत्रालयात असल्या कारणाने शिवसेनेला पाठिंबा देण्याचा डाव भाजपने उधळला . शनिवारी कार्यालयीन सुट्टी असल्यामुळे आता हा कार्यक्रम थेट...