Posts

Showing posts with the label अर्थसंकल्प

जिओ कॅप्सूल : ५ मिनटात वाचा ठळक बातम्या थोडक्यात

Image
चित्रपटगृहांत राष्ट्रगीत सक्‍ती नाही : सर्वोच्च न्यायालय गत काही काळापासून चित्रपटगृहांतील राष्‍ट्रगीत सक्‍तीवरून सुरू असणारे द्वंद्व आता थांबणार आहे. सर्वोच्‍च न्यायालयाने केंद्र सरकाच्या विनंतीनुसार आपला राष्‍ट्रगीत सक्‍तीचा निर्णय मागे घेतला आहे. याबाबत झालेल्या आजच्या सुनावणीत सर्वोच्‍च न्यायालयाने हा निकाल दिला. दरम्यान , तत्कालीन सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी नोव्हेंबर २०१६ रोजी चित्रपटगृहांत चित्रपट सुरू होण्याआधी राष्ट्रगीत गायनाची सक्ती केली होती. तर ऑक्टोबर २०१७ रोजी तत्कालीन न्या. डी. वाय. चंद्रचूड यांनी राष्ट्रगीत गायनावेळी उभे राहण्याची प्रेक्षकांवर सक्ती करता येणार नसल्याचे मत नोंदविले होते. लोकांवर नैतिक धोरणांची सक्ती करणे उचित नाही. उभे राहिल्याने राष्ट्रभक्ती सिद्ध झाली , असे म्हणणे तर्कसंगत नसल्याचेही चंद्रचूड यांनी केंद्र सरकारला नव्याने परिपत्रक जारी करण्याचे आदेश दिले होते. या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने हा आदेश मागे घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने हा निकाल दिला आहे. _____________________________ महाराष...