5 ऑक्टोबरच्या ठळक बातम्या थोडक्यात
मनसेचा संताप मोर्चा परेल - एलफिन्स्टन स्टेशनला जोडणा - या रेल्वे पूलावर 29 सप्टेंबरला झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेच्या निषेधार्थ मनसेने गुरुवारी संताप मोर्चा काढला होता . मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी यावेळी जमलेल्या गर्दीसमोर भाषण करताना शासनावर कठोर टीका केली . पंधरा दिवसात मध्य व पश्चिम रेल्वेमार्गावरील फेरीवाले उठवले पाहिजे . तुम्ही केलं नाही तर सोळाव्या दिवशी माझी माणसं ते काम करतील . त्यानंतर जो संघर्ष होईल त्याला रेल्वे जबाबदार असेल अशा शब्दांमध्ये राज ठाकरेंनी सरकारला इशारा दिला . इतक्या वर्षांचे प्रलंबित प्रश्न आजही सुटत नाहीत . आधीच्या सरकारमध्ये जी परिस्थिती तीच आजच्या सरकारमध्ये . त्यामुळे हा संताप असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले . तसेच यावेळी बुलेट ट्रेनवर टीका करत मुठभरांसाठी बुलेट ट्रेन आणणार , त्यांच्यासाठी लाख कोटीचे कर्ज काढणार आणि अख्खा देश हे कर्ज फेडत बसणार , हे चालणार नाही , असे भाष्य केले . ______________________________________ पेट्रोल - डिझेलचे द...