5 ऑक्टोबरच्या ठळक बातम्या थोडक्यात

मनसेचा संताप मोर्चा
परेल-एलफिन्स्टन स्टेशनला जोडणा-या रेल्वे पूलावर 29 सप्टेंबरला झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेच्या निषेधार्थ मनसेने गुरुवारी संताप मोर्चा काढला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी यावेळी जमलेल्या गर्दीसमोर भाषण करताना शासनावर कठोर टीका केली. पंधरा दिवसात मध्य पश्चिम रेल्वेमार्गावरील फेरीवाले उठवले पाहिजे. तुम्ही केलं नाही तर सोळाव्या दिवशी माझी माणसं ते काम करतील. त्यानंतर जो संघर्ष होईल त्याला रेल्वे जबाबदार असेल अशा शब्दांमध्ये राज ठाकरेंनी सरकारला इशारा दिला. इतक्या वर्षांचे प्रलंबित प्रश्न आजही सुटत नाहीत. आधीच्या सरकारमध्ये जी परिस्थिती तीच आजच्या सरकारमध्ये. त्यामुळे हा संताप असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच यावेळी बुलेट ट्रेनवर टीका करत मुठभरांसाठी बुलेट ट्रेन आणणार, त्यांच्यासाठी लाख कोटीचे कर्ज काढणार आणि अख्खा देश हे कर्ज फेडत बसणार, हे चालणार नाही, असे भाष्य केले.
______________________________________

पेट्रोल-डिझेलचे दर आणखी कमी होण्याची शक्यता
मंगळवारी केंद्र शासनाने पेट्रोल आणि डिझेल वर बेसिक एक्साईज ड्युटी कमी केल्यामुळे मध्यरात्रीपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दारात रुपयांनी कपात झाली होती. त्यानंतर पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सर्व राज्यांना पेट्रोल आणि डिझेल वरील व्हॅट कमी करा, थोडा भार केंद्राने उचलला थोडा हातभार राज्याने पण लावा असे आवाहन केले होते. या आवाहनाला गुजरात राज्याने सकारात्मक प्रतिकार देत गुरुवारी व्हॅट कमी केला. मात्र केरळचे वित्त मंत्री थॉमस इसाक यांनी केंद्रशासनावर टीका केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की पेट्रोलवर टॅक्स फक्त केंद्राने वाढविला होता मग कमी करण्याचे ओझे राज्यावर कशाला? केंद्रानेच आणखी कपात करून दर कमी करावे असे मत त्यांनी व्यक्त केले.
______________________________________


नरेंद्र मोदींच्या क्लीन चिटवर हायकोर्टाचा शिक्कामोर्तब
गुजरात २००२ च्या दंगली दरम्यान गुलबर्गा सोसायटी दंगलप्रकरणी काँग्रसचे माजी खासदार एहसान जाफरी यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी या दंगलीमागे गुजरातचे तत्कालीन मुख्य मंत्री नरेंद्र मोदी यांच्या सह आणखी ५७ जणांनी  कट रचला असल्याचा आरोप जाफरी यांच्या पत्नी झाकिया जाफरी यांनी केला होता. मात्र या प्रकरणी खालच्या न्यायालयाने या सर्वांना क्लीन चीट दिली होती. या विरोधात जाफरी सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड यांनी गुजरात उच्च न्यायालयात चौकशीची याचिका दाखल केली होती. मात्र गुरुवारी न्यायालयाने ही याचिका फेटाळून नरेंद्र मोदींच्या क्लीन चिटवर शिक्कामोर्तब केला.
______________________________________


रजनीश कुमार एसबीआयचे नवे अध्यक्ष
देशातली दुस-या क्रमांकाची सर्वात मोठी बँक अशी ओळख असलेल्या स्टेट बँकेच्या अध्यक्षपदाची सूत्रं रजनीश कुमार यांच्याकडे जाणार आहेत. एक वर्षाची मुदतवाढ मिळालेल्या स्टेट बँकेच्या विद्यमान अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य, उद्या निवृत्त होत आहेत. 7 ऑक्टोबरला रजनीश कुमार अध्यक्षपदाची सूत्रं स्विकारतील. १९८० मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर पदावर स्टेट बँकेत रुजू झालेले रजनीश कुमार, २०१५ मध्ये स्टेट बँकेचे व्यवस्थापकीय संचालकपदी विराजमान झाले. रजनीश कुमार यांच्यासमोर सातत्यानं वाढणारी थकीत कर्जं, सहा बँकांच्या विलीनीकरणानंतर निर्माण झालेली परिस्थिती आणि इतरही आव्हानं असणार आहेत.
______________________________________


फोर्ब्स टॉप १०० श्रीमंतांची यादी जाहीर
'फोर्ब्स' या प्रसिध् मासिकाने २०१७ च्या टॉप शंभर श्रीमंत भारतीयांची यादी जाहीर केली आहे. दरवर्षी प्रसिद्ध होणाऱ्या या यादीमध्ये सलग दहाव्यांदा रिलायन् इंडस्ट्रीचे मालक मुकेश अंबानी अग्रस्थानी आहेत. त्यांची संपत्ती ३८ अब् डॉलर इतकी आहे. या यादीत दुसर्या स्थानावर विप्रोचे चेअरमन अजीज प्रेमजी आहेत. तर तिसर्या स्थानावर हिंदुजा ब्रदर्स आहेत. अजीज प्रेमजी यांची १९ अब् डॉलर इतकी संपत्ती असल्याचे फोर्ब्सने म्हटले आहे. तसेच हिंदुजा ब्रदर्सची संपत्ती १८. अब् डॉलर असल्याची नोंद करण्यात आले आहे. तसेच या १०० जणांच्या यादीत सावित्री जिंदाल आणि किरण शॉ यांच्या सह फक्त आणखी महिलांचा समावेश आहे.
______________________________________


Popular posts from this blog

जिओ कॅप्सूल : ५ मिनटात वाचा ठळक बातम्या थोडक्यात

Top stories on 23rd October in a capsule