जिओ कॅप्सूल : ठळक बातम्या थोडक्यात
मी फक्त चहा विकला देश विकला नाही - नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातमध्ये सोमवार पासून गुजरात निवडणुकांसाठी प्रचाराला सुरूवात केली. सोमवारी त्यांनी गुजरातमध्ये चार सभा केल्या. यावेळी काँग्रेसपक्षाकडून झालेल्या प्रत्येक टीकेचे उत्तर त्यांनी दिले. भुजमधल्या पहिल्याच सभेत मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. गुजरातच्या मुलावर गुजरातमध्ये येऊनच खोटे आरोप करणाऱ्यांना गुजरातची जनता माफ करणार नाही असे मोदी म्हणाले. तसेच सरदार पटेल यांच्या काळात काँग्रेसनं गुजरातवर दुजाभाव केला. त्यावेळच्या जनतेनं ते सहन केलं. पण आजची स्थिती वेगळी आहे. आज तुम्ही असा अपमान सहन कराल का असा प्रश्न यावेळी मोदींनी केला. ' माझ्या गरिब पार्श्वभुमीमुळे काँग्रेस मला नापसंद करतं. एखादा पक्ष इतका खालच्या स्तराला जाऊ शकतो का ? हो गरिब कुटुंबातील एक व्यक्ती पंतप्रधान झाला आहे. यावरुन झालेला संताप ते लोक लपवू शकलेले नाहीत. हो मी चहा विकला , देश विकलेला नाही ', असेही नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. _________________________________ इंडोनेशियात ज्वालामुखीचा उद्रेक , ४५ विमान उड्डाने रद्द...