Posts

Showing posts with the label एसबीआय

१४ डिसेंबरच्या ठळक घडामोडी थोडक्यात

Image
ठाकरे मंत्रिमंडळात 48 तासांत 2 नेत्यांच्या खात्यांत बदल उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर तब्बल 15 दिवसांनी नेत्यांना तात्पुरते खातेवाटप करण्यात आले. खातेवाटप झाल्यानंतर मंत्रिमंडळातील राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांच्याकडील काही खात्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. गुरुवारी संध्याकाळी ठाकरे सरकारचं खातेवाटप घोषित झाल्यानंतर अवघ्या 48 तासांच्या आतंच खातेबदल करण्यात आले आहे. बदललेल्या खात्यानुसार जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास याची जबाबदारी आता जयंत पाटील यांना देण्यात आली आहे. तर अन्न आणि नागरी पुरवठा, अल्पसंख्याक विकास आणि कल्याण ही खाती आता छगन भुजबळ यांच्याकडे देण्यात आली आहेत. म्हणजेच भुजबळ आणि जयंत पाटलांच्या काही खात्यांची अदलाबदल करण्यात आली आहे. खातेबदलाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मान्यता दिली आहे. *************** मरेन पण माफी मागणार नाही – राहूल गांधी “माझे नाव राहुल सावरकर नाही, तर राहुल गांधी आहे,” त्यामुळे मी माफी मागणार नाही,” असे म्हणत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजप सरकारवर सडकून टीका केली. नागरिकत्व ...

जिओ कॅप्सूल : ५ मिनटात वाचा ठळक बातम्या थोडक्यात

Image
दिवसा नाही दिसणार टीव्हीवर काँडमच्या जाहिराती माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने टेलिव्हिजनवर दाखवल्या जाणाऱ्या काँडमच्या जाहिरातींच्या प्रसारणावर निर्बंध घातले आहेत. यापुढे सकाळी सहा ते रात्री दहा वाजपर्यंत कंडोमच्या जाहिराती दाखवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यासंदर्भात समाजाच्या विविध स्तरातून तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. दिवसभरात सातत्याने प्रसारित होणाऱ्या काँडमच्या जाहिराती विशिष्ट वयोगटातल्या व्यक्तींसाठी आहेत. लहान मुलांसाठी या जाहिरातींचे प्रसारण उचित नसल्यानं कंडोमच्या जाहिराती दिवसभरात दाखवण्यात येऊ नये असे स्पष्ट निर्देश मंत्रालयानी दिले आहेत. या जाहिरातींमध्ये अनेकदा काही आक्षेपार्ह दृश्यांचाही समावेश असतो. ही दृश्यं लहान मुलांनी पाहणं योग्य नसतं. त्यामुळे हे निर्देश देण्यात आले आहेत. नियमांचं उल्लंघन झाल्यास कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल असंही मंत्रालयाच्या अधिसूचनेत म्हटलंय. _______________________ पाण्याच्या बाटलीसाठी MRP पेक्षा जास्त पैसे घेतल्यास कारावास भोगावा लागणार एक लिटर पाण्याच्या बाटलीचा दर हा रेल्वे स्थानक , बस स्था...

5 ऑक्टोबरच्या ठळक बातम्या थोडक्यात

मनसेचा संताप मोर्चा परेल - एलफिन्स्टन स्टेशनला जोडणा - या रेल्वे पूलावर 29 सप्टेंबरला झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेच्या निषेधार्थ मनसेने गुरुवारी संताप मोर्चा काढला होता . मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी यावेळी जमलेल्या गर्दीसमोर भाषण करताना शासनावर कठोर टीका केली . पंधरा दिवसात मध्य व पश्चिम रेल्वेमार्गावरील फेरीवाले उठवले पाहिजे . तुम्ही केलं नाही तर सोळाव्या दिवशी माझी माणसं ते काम करतील . त्यानंतर जो संघर्ष होईल त्याला रेल्वे जबाबदार असेल अशा शब्दांमध्ये राज ठाकरेंनी सरकारला इशारा दिला . इतक्या वर्षांचे प्रलंबित प्रश्न आजही सुटत नाहीत . आधीच्या सरकारमध्ये जी परिस्थिती तीच आजच्या सरकारमध्ये . त्यामुळे हा संताप असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले . तसेच यावेळी बुलेट ट्रेनवर टीका करत मुठभरांसाठी बुलेट ट्रेन आणणार , त्यांच्यासाठी लाख कोटीचे कर्ज काढणार आणि अख्खा देश हे कर्ज फेडत बसणार , हे चालणार नाही , असे भाष्य केले . ______________________________________ पेट्रोल - डिझेलचे द...