१४ डिसेंबरच्या ठळक घडामोडी थोडक्यात


ठाकरे मंत्रिमंडळात 48 तासांत 2 नेत्यांच्या खात्यांत बदल


उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर तब्बल 15 दिवसांनी नेत्यांना तात्पुरते खातेवाटप करण्यात आले. खातेवाटप झाल्यानंतर मंत्रिमंडळातील राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांच्याकडील काही खात्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. गुरुवारी संध्याकाळी ठाकरे सरकारचं खातेवाटप घोषित झाल्यानंतर अवघ्या 48 तासांच्या आतंच खातेबदल करण्यात आले आहे.

बदललेल्या खात्यानुसार जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास याची जबाबदारी आता जयंत पाटील यांना देण्यात आली आहे. तर अन्न आणि नागरी पुरवठा, अल्पसंख्याक विकास आणि कल्याण ही खाती आता छगन भुजबळ यांच्याकडे देण्यात आली आहेत. म्हणजेच भुजबळ आणि जयंत पाटलांच्या काही खात्यांची अदलाबदल करण्यात आली आहे. खातेबदलाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मान्यता दिली आहे.
***************

मरेन पण माफी मागणार नाही – राहूल गांधी


“माझे नाव राहुल सावरकर नाही, तर राहुल गांधी आहे,” त्यामुळे मी माफी मागणार नाही,” असे म्हणत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजप सरकारवर सडकून टीका केली. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक, ढासळती अर्थव्यवस्था, वाढती बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या समस्या अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर काँग्रेसने आज (१४ डिसेंबर) मोदी सरकारविरोधात रामलीला मैदानात ‘भारत बचाव रॅली’ आयोजन करण्यात आले.

राहुल गांधी पुढे म्हणाले की, “जर कोणाला माफी मागायची असेल तर मोदींचे असिस्टंट असलेल्या अमित शहांनी माफी मागावी,” अशा शब्दात त्यांनी अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तोफ डागली. यावेळी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी भाजप आणि मोदी सरकारवर निशाणा साधला.
***************

खडसे यांची इच्छा असेल तर त्यांचे राष्ट्रवादीत स्वागतच : अजित पवार


एकनाथ खडसे हे मोठे नेते आहेत त्यांनी इच्छा दर्शवली तर त्यांचे राष्ट्रवादीत स्वागतच आहे. असे मत पक्षाच्या वतीने अजित पवारांनी पत्रकारांशी बोलताना केले. आपल्या मंत्रीपदाबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हेच निर्णय घेतील असेहा ते पुढे म्हणाले.

निवडणूकीत एकनाथ खडसेंच्या मुलगी रोहिणी खडसेचा पराभव झाला, आणि हा पराभव पक्षातीलच काही नेत्यांच्या बंडामुळे झाला असावा असे म्हंटले जात आहे. याबाबतीत पक्षाकडून दखल घेतली जात नसल्यामुळे एकनाथ खडसे नाराज आहेत. नाराज खडसे पक्ष सोडण्याच्या मनस्थितीत असल्याचे म्हंटले जात होते. गोपीनाथ गडावर एकनाथ खडसेंनी आपल्या मनातली खदखद व्यक्त केली. आता अजित दादांनी खडसेंना खुली ऑफर दिल्याने चर्चेला उधाण आले आहे. आता एकनाथ खडसेंचे पुढचे पाऊल काय असणार आहे याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहेय.
***************

आज मध्यरात्रीपासून लागू होणार Fastag


येत्या १५ आणि १६ डिसेंबरपासून बँकिंग, रस्ते वाहतूक आणि दूरसंचार क्षेत्रातील ग्राहकांशी संबंधित अनेक नवीन बदल अंमलात येणार आहेत. जर आपण राष्ट्रीय महामार्गांचा वापर करत असाल तर, १४ डिसेंबर रोजी मध्यरात्री म्हणजेच रात्री १२ नंतर फास्टॅगची यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. तर सोमवारपासून म्हणजेच १६ डिसेंबरपासुन NEFTची सुविधा २४ तास उपलब्ध होईल.

अंतिम मुदत न वाढविल्यास फास्टॅग १५ डिसेंबरला सर्व राष्ट्रीय महामार्गांच्या टोल नाक्यावर लागू होईल. त्यामुळे आता टोलनाक्यावर गाड्यांसाठी २ प्रकारच्या रांगा लागणार. एक म्हणजे फास्टॅग आणि दुसरी म्हणजे हायब्रीड लेन. फास्टॅग लेनमध्ये गाडी नेल्यास दुहेरी टोल आकारला जाईल त्याचबरोबर हायब्रीड लेनमध्ये फास्टॅग नसलेल्या वाहनांकडून टोल घेतले जाणार आहे.
***************

SBIचा खातेधारकांना इशारा


भारतातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना बँकेने एक इशारा दिला आहे. जर तुम्ही सार्वजनिक ठिकाणी चार्जिंग स्टेशनवर आपला मोबाइल फोन चार्ज करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची आहे. कारण, सार्वजनिक चार्जिंग स्टेशनवर फोन चार्जिंग करु नका नाही तर तुम्हाला मोठं नुकसान होईल असा इशारा बँकेने दिला आहे. असे केल्याने तेथेली मालवेअर (व्हायरस) तुमच्या फोनमध्ये एन्ट्री करेल आणि त्याच्या माध्यमातून हॅकर्स तुमचा डेटा चोरी करण्याची शक्यता बँकेने वर्तवली आहे.

एसबीआयने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, 'ज्यूस जॅकिंग, एक यूएसबी चार्जर घोटाळा आहे. तुमच्या बँक खात्यातील रक्कम पूर्णपणे खाली करु शकतं'. हॅकर्स चार्जिंग स्टेशन्सवरुन तुमच्या ऑनलाईन बँकिंग किंवा पेमेंट सर्व्हिस अॅप संबंधित यूजर आयडी आणि पासवर्ड चोरी करु शकतात. यामुळे तुम्हाला मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं.


Comments

Popular posts from this blog

जिओ कॅप्सूल : ५ मिनटात वाचा ठळक बातम्या थोडक्यात

Top stories on 23rd October in a capsule