जिओ कॅप्सूल : ५ मिनटात वाचा ठळक बातम्या थोडक्यात
कोरेगाव भीमा प्रकरणी मला टार्गेट केलं जातंय- जिग्नेश मेवाणी मी ३१ डिसेंबरला पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत कोणत्याही प्रकारचे भडकाऊ भाषण केलेले नाही. भीमा-कोरेगाव घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीच का बोलत नाहीत , असा सवाल वडगामचे नवनिर्वाचित आमदार आणि दलित नेते जिग्नेश मेवाणी यांनी केला आहे. प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी पुण्यात मेवाणी आणि विद्यार्थी नेता उमर खालिद यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. भीमा-कोरेगाव लढ्याला २०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ३१ डिसेंबरला शनिवारवाड्यावर एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. आमदार जिग्नेश मेवाणी , जेएनयू नेता उमर खालिद या परिषदेत सहभागी झाले होते. आपण पंतप्रधानांना संविधान आणि मनुस्मृती घेऊन भेटणार असल्याचेही मेवाणी यांनी यावेळी सांगितले. पंतप्रधानांसमोर या दोन्ही गोष्टी ठेवल्यानंतर ते मनुस्मृती आणि संविधान यापैकी काय निवडतात , हे मला पाहायचे असल्याचे त्यांनी सांगितले. ________________________ कोणत्याही समितीच्या चौकशीला तयार- संभाजी भिडे माझे नाव भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात नाहक गोवण्यात आले अ...