१ नोव्हेंबरच्या ठळक बातम्या थोडक्यात
कमाईचा विचार करूनच अपघात विम्याची रक्कम दिली जाईल रस्ते अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या भविष्यातील उत्पन्नाचा विचार करुन त्याच्या कुटुंबीयांना भरपाई देण्यात यावी , असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे . त्यामुळे यापुढे विम्याची रक्कम देताना मृत्यू झालेली व्यक्ती जिवंत असती , तर भविष्यात तिची कमाई किती असती , ही बाब यापुढे पाहिली जाणार आहे . सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील ५ सदस्यीय खंडपीठाने हा निकाल दिला . रस्ते अपघातात मृत्यू झालेली व्यक्ती जर नोकरी करत असेल आणि तिचं वय 40 पेक्षा कमी असेल , तर त्या व्यक्तीचं उत्पन्न सध्याच्या कमाईपेक्षा 50 टक्के जास्त धरलं जाणार आहे . मृत पावलेली व्यक्ती 40 ते 50 वर्ष वयोगटातील असेल , तर भरपाईची रक्कम ३० टक्क्यांनी वाढवली जाणार आहे . मृत व्यक्ती 50 ते 60 वयोगटातील असेल तर भविष्यातील उत्पन्न १५ टक्क्यांनी वाढवलं जाईल , असं सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने स्पष्ट केलं आहे . __________________________________________...