२१ सेप्टेंबरच्या ठळक बातम्या थोडक्यात
नारायण राणे यांचा काँग्रेसला घटस्फोट महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी अखेर गुरुवारी काँग्रेस पक्षाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे . त्यांच्या सह त्यांचे खंदे समर्थक असलेले दत्ता सामंत यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी देखील काँग्रेस सदस्यत्वाचा आणि पदाचा राजीनामा दिला . राजकीय कारकीर्दीतील नारायण राणे यांचे हे दुसरे बंड होते . वयाच्या 16 व्या वर्षापासून शिवसेनेमधून नारायण राणे यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली होती . स्थानिक शाखाप्रमुख ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असा प्रवास करणा - या नारायण राणेंची महत्वकांक्षी आणि आक्रमक नेते अशी ओळख आहे . काँग्रेस सोडल्यानंतर आता कोणत्या पक्षात जाणार याबाबतचा निर्णय त्यांनी राखीव ठेवला आहे . दोन आठवड्या नंतर याबाबतची माहिती ते जाहीर करतील असे ते गुरुवारी झालेल्या प्रेस कॉन्फरेन्स मध्ये म्हणाले . राज ठाकरेंची ' राजगर्जना ' आता फेसबुकवर राज ठाकरे यांनी गुरुवारी स्वत : च्या फेसबुक पेजचे ( www.faceb...