६ नोव्हेंबरच्या ठळक बातम्या थोडक्यात
काळ्या पैशांची पॅराडाईज पेपर्स नावाची यादी जर्मनीतील ' सुददॉइश झायटुंग ' या वृत्तपत्रानं काळा पैशांसंदर्भातील नवा गौप्यस्फोट केलेला आहे . या वृत्तपत्रानं ' पॅराडाइज पेपर्स ' उजेडात आणले आहेत . याच वृत्तपत्रानं 18 महिन्यांपूर्वी पनामा पेपर्ससंदर्भात खुलासा केला होता . इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार , 96 नामांकित माध्यम समूहांनी मिळून ' पॅराडाइज पेपर्स ' चा खुलासा करण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे . पॅराडाइज पेपर्समध्ये 1.34 कोटी दस्तऐवजांचा समावेश आहे . या खुलाशाद्वारे बनावट कंपन्यांबद्दल माहिती समोर आली आहे , ज्याद्वारे जगभरातील श्रीमंत आणि सामर्थ्यशाली मंडळी आपला पैसा परदेशात पाठवण्यासाठी वापर करत होते . ' पॅराडाइज पेपर्स ' मध्ये भारतातील 714 जणांचा समावेश आहे . यादीमध्ये जगभरातील एकूण 180 देशांच्या नावाचा समावेश आहे . यामध्ये भारत 19 व्या क्रमांकावर असल्याची माहिती समोर आली आहे . नागरी हवाई राज्यमंत्री जयंत सिन्हा , बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन , व...