Posts

Showing posts with the label हिंदू धर्म

जिओ कॅप्सूल : ठळक बातम्या वाचा ५ मिनटात

Image
राहुल गांधींच्या हिंदुत्वावर राजकारण गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी बुधवारी सोमनाथच्या दौऱ्यावर होते. त्यांना पक्षाच्या कार्यकर्त्यांसह सोमनाथाचं दर्शन घेऊन पूजाही केली. यावेळी सर्व कार्यकर्त्यांचा नोंद ही हिंदू रजिस्टरमध्ये करण्यात आली तर राहुल गांधी आणि आणि अहमद पटेल यांच्या नावाची नोंद गैरहिंदू रजिस्टरमध्ये करण्यात आली. त्यांची नोंद गैर हिंदू रजिस्टरमध्ये केली असल्याने नव्या वादाला तोंड फुटले. यावरून भाजपानेत्यांनी राहुल गांधींवर टीकेचा वर्षाव केला. तर काँग्रेसपक्षाने ती नोंद स्वतः राहुल गांधी यांनी केली नसून ती एका सहकार्याने केली व ती चुकून करण्यात आली आहे असे पक्ष मांडले. भाजपा या छोट्याशा मुद्द्याला ताणून धरून घाणेरडे राजकारण खेळात असल्याचीही टीका काँग्रेसनेंत्यानी केली आहे. ____________________________________  कोपर्डी बलात्कार आणि हत्याप्रकरणातील तीनही आरोपींना फाशी महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या कोपर्डी खून व अत्याचार प्रकरणाचा बुधवार २९ नोव्हेंबर रोजी निकाल लागला. या प्रकरणातील तिन्ही आरोपी जितेंद्र शिंदे , स...