वाचा ठळक बातम्या थोडक्यात
२६/११ हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद मोकाट मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि ‘ जमात-उद-दवा ’ चा म्होरक्या हाफिज सईद याच्या सुटकेचे आदेश पाकिस्तान न्यायालयाने दिले आहेत. अमेरिकेने सईदच्या अटकेसाठी इनाम घोषित करून आणि भारतानेही त्याच्या दहशतवादी कृत्याबाबत सबळ पुरावे देऊनही सईद मोकाट सुटल्याने पाकिस्तान सरकारची नाचक्की झाली आहे. मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात सुमारे 166 निष्पाप लोकांचा बळी गेला होता. हाफिज सईद आणि ‘ लष्कर-ए-तोयबा ’ चा कमांडर झकिउर रेहमान यांनीच हल्ल्याचा कट रचल्याचे उघड झाले होते. त्यामुळे सईदला पाकिस्तानी सरकारने गेल्यावर्षी जानेवारी महिन्यापासून नजरकैदेत ठेवण्यात आले होते. सईदच्या नजरकैदेबाबत न्यायालयात पुरावे देण्यास पाकला अपयश आले आहे. त्यामुळेच न्यायालयाने सईदची सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. दोन दिवसांत सईद नजरकैदेतून बाहेर येण्याची शक्यता आहे. __________________ न्यायमूर्तींना अखेर मिळणार वेतन वाढ सर्वोच्च न्यायालय तसेच 24 उच्च न्यायालयांतील न्यायमूर्तींच्या वेतनात वाढ करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली....