Posts

Showing posts with the label सचिन

जिओ कॅप्सूल : ५ मिनटात वाचा ठळक बातम्या थोडक्यात

Image
2 जी घोटाळ्यात सर्व आरोपी दोषमुक्त काँग्रेस नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात झालेल्या सर्वात मोठ्या घोटाळ्याप्रकरणी माजी दुरसंचारमंत्री आणि डीएमकेचे नेते ए.राजा व डीएमकेच्या राज्यसभेतील सदस्य कनीमोझी यांना न्यायालयाने दोषमुक्त केले आहे. २ जी घोटाळ्यासंदर्भात पटियाळा हाऊस येथील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने हा निर्णय दिला. २ जी घोटाळ्यासंदर्भात एकूण ३ खटले न्यायालयात सुरु असून त्यापैकी दोन सीबीआयद्वारे तर एक अंमलबजावणी संचालनालयाने दाखल केला आहे. ‘ यूपीए २ ’ ( संयुक्त पुरोगामी आघाडी) च्या कार्यकाळात टू जी स्पेक्ट्रम घोटाळा उघडकिस आला होता. या घोटाळ्यामुळे शासनाचे सुमारे १.७६ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले होते , याबाबतचा अहवाल ‘ कॅग ’ ने दिला होता. या घोटाळ्यामुळे तत्कालिन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या प्रतिमेलाही धक्का बसला होता. _________________ राज्यात ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा होणार कमी शासनाच्या विविध योजनांचा लाभ ज्येष्ठ नागरिकांना मिळावा , यासाठी राज्य सरकारकडून ६५ वयाची मर्यादा घालण्यात आली. पण लवकरच ही वयोमर्यादा ...