जिओ कॅप्सूल : ५ मिनटात वाचा ठळक बातम्या थोडक्यात



2जी घोटाळ्यात सर्व आरोपी दोषमुक्त



काँग्रेस नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात झालेल्या सर्वात मोठ्या घोटाळ्याप्रकरणी माजी दुरसंचारमंत्री आणि डीएमकेचे नेते ए.राजा व डीएमकेच्या राज्यसभेतील सदस्य कनीमोझी यांना न्यायालयाने दोषमुक्त केले आहे. २ जी घोटाळ्यासंदर्भात पटियाळा हाऊस येथील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने हा निर्णय दिला. २ जी घोटाळ्यासंदर्भात एकूण ३ खटले न्यायालयात सुरु असून त्यापैकी दोन सीबीआयद्वारे तर एक अंमलबजावणी संचालनालयाने दाखल केला आहे. यूपीए २’ (संयुक्त पुरोगामी आघाडी) च्या कार्यकाळात टू जी स्पेक्ट्रम घोटाळा उघडकिस आला होता. या घोटाळ्यामुळे शासनाचे सुमारे १.७६ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले होते, याबाबतचा अहवाल कॅगने दिला होता. या घोटाळ्यामुळे तत्कालिन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या प्रतिमेलाही धक्का बसला होता.
_________________


राज्यात ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा होणार कमी


शासनाच्या विविध योजनांचा लाभ ज्येष्ठ नागरिकांना मिळावा, यासाठी राज्य सरकारकडून ६५ वयाची मर्यादा घालण्यात आली. पण लवकरच ही वयोमर्यादा कमी होण्याची शक्यता आहे. आता ६५ वरून ज्येष्ठ नागरिकांचे वय ६० करण्यात येणार असल्याचे आश्वासन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले आहे. सध्या राज्यात ६५ वर्षांवरील व्यक्ती ज्येष्ठ नागरिक म्हणून राज्य सरकारच्या सवलत घेऊ शकतात. पण या सवलतीचा लाभ त्यापेक्षा कमी वय असलेल्या नागरिकाला घेता येत नाही. त्यानंतर राज्य सरकार आता अशा सर्व नागरिकांसाठी वयोमर्यादा कमी करण्याच्या तयारीत आहे, याबाबतचे आश्वासन बडोले यांनी दिले आहे.
_________________


बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी सपत्नीक फरार



प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी सपत्नीक मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर फरार झाले आहेत. गुरुवारी पुण्यात डी. एस. कें.च्या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या कर्जरोखे धारकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. अर्थात डी. एस. के. आणि त्यांच्या पत्नी हेमंती या बैठकीला गैरहजर होते. १ एप्रिल २०१८ पर्यंत मुदत कंपनीच्या इतर संचालकांनी पैसे परत करण्यासाठी वाढवून देण्याची मागणी गुंतवणुकदारांना केली आहे. पण आता डी. एस. कें.च्या शब्दावर विश्वास राहीला नसल्याने गुंतवणुकदारांनी ही मुदत देण्यास नकार देत तात्काळ पैसे देण्याची मागणी केली. ही बैठक डीएसकेंच्या कंपनीचे संचालक आणि कर्मचारी समाधानकारक उत्तरे देऊ न शकल्यानेआटोपती घ्यावी लागली. पैसे परत मिळत नसल्याने अनेक गुंतवणुकदार अक्षरश रडकुंडीला आल्याच यावेळी दिसून आले.
_________________


महाराष्ट्र राज्य इन्कम टॅक्स भरण्यात प्रथम


प्राप्तिकर खात्याने जाहीर केलेल्या एका आकडेवारी नुसार २०१४-१५ या आर्थिक वर्षासाठी देशातील ४ कोटी दहा लाख लोकांनी इन्कम टॅक्स रिटर्न भरला आहे. पण, त्यातील दोन कोटी लोकांनी आपली मिळकत नॉन टॅक्सेबल असल्याचे जाहीर केले आहे. महाराष्‍ट्र आणि दिल्‍ली ही सर्वाधिक कर भरणारी राज्‍ये आहेत, असे प्राप्तिकरच्या अहवालात म्हटले आहे.  अहवालानुसार महाराष्ट्र आणि दिल्ली या राज्यांतून सर्वाधिक प्राप्तिकर जमा झाला आहे. त्यात महाराष्ट्रातून सर्वाधिक ३७ टक्के कर जमा झाला आहे. पाठोपाठ दिल्लीतून १२.८, कर्नाटकमधून १०.१, तमीळनाडूतून ७,, गुजरातमधून ४.६, आंध्र प्रदेशातून ४.३, पश्चिम बंगालमधून ४.१, उत्तर प्रदेशमधून ३.५, हरियाणातून २.४ तर राजस्थानमधून २.४ टक्के कर जमा झाला आहे. तीन वर्षांत दुप्‍पट कर गोळा करण्‍याची किमया तेलंगणा राज्‍याने केली आहे.
_________________


सचिनच्या राज्यसभेतील पहिल्या भाषणात गोंधळ



५ वर्षात पहिल्यांदाच गुरुवारी राज्यसभेत सचिन बोलण्यासाठी उभा राहिला आणि विरोधकांच्या गदारोळामुळे सचिनला बोलताच आले नाही. भारतरत्‍न सचिन तेंडुलकर आज राइट टु प्‍ले वर बोलणार होते. मात्र, विरोधीपक्षाच्या सदस्यांनी गदारोळ सुरू केल्यानंतर सचिनला बोलता आले नाही. उपराष्‍ट्रपती व्यंकय्‍या नायडू यांनीही विरोधकांना वारंवार शांत राहण्याची सूचना केली. सदनात बोलणारी व्यक्‍ती भारतरत्‍न आहे. त्यांचे भाषण संपूर्ण देश पाहत आहे, याचे तरी भान ठेवा, असे आवाहन केल्यानंतरही गदारोळ थांबला नाही. गुजरात निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर टीकास्‍त्र सोडले होते. त्या विरोधात संसदेत विरोधक आक्रमक झाले आहेत. त्याच बाबत सचिन बोलण्यास उभा राहिला असताना गदारोळ सुरु झाला. त्यामुळे राज्यसभेचे कामकाज २२ डिसेंबरच्या ११ वाजेपर्यंत तहकुब करण्यात आले आहे.
_________________


Popular posts from this blog

जिओ कॅप्सूल : ५ मिनटात वाचा ठळक बातम्या थोडक्यात

Top stories on 23rd October in a capsule