जिओ कॅप्सूल : ५ मिनटात वाचा ठळक बातम्या थोडक्यात
रूग्णालयावर हल्ला करून २ दहशतवादी फरार
श्रीनगरमधील
श्रीहरी सिंह रुग्णालयात पोलिसांवर गोळीबार करून दोन दहशतवादी फरार झाले आहेत. अबू
हंजुला असे फरार झालेल्या यातील एका दहशतवाद्याचे नाव आहे. त्याला वैद्यकिय
तपासणी करण्याकरिता हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले होते. त्यावेळी काही
दहशवतवाद्यांनी रूग्णालयावर हल्ला केला हंजुला यानेही यावेळी पोलिसांच्या
हातातील रायफल हिसाकवून घेत पोलिसांवर गोळीबार केला. त्यात दोन पोलिस शहीद झाले
आहेत. मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हंजुला याला वैद्यकीय तपासणीसाठी
श्रीहरी सिंह रूग्णालयात आणण्यात आले होते. ही माहिती दहशतवाद्यांना मिळाल्यानंतर
हंजुलाला सोडविण्यासाठी या दहशतवाद्यांनी रूग्णालयावरच हल्ला चढवत रूग्णालयाच्या
आतच या अंधाधूंद गोळीबार केला. यावेळी हंजुलानेही पोलिसांच्या हातातून रायफल घेत
पोलिसांवर गोळीबार केला आणि पोलिसांच्या हातून पळ काढला.
तीन दिवसात शेअर बाजारात 9.6 लाख कोटीचे नुकसान
अर्थसंकल्प सादर
होण्याआधी रोज नवनवीन उच्चांक नोंदवत असलेला शेअर बाजार आता त्याच वेगाने लोळण घेत
आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यापासून गंटागळया खाणारा शेअर बाजार अद्याप सावरलेला
नाही. आज तर शेअर बाजारात विक्रमी घसरण झाली. सकाळी बाजार उघडण्यापूर्वी सेन्सेक्स
तब्बल 1200 अंकांनी तर निफ्टी 300 अंकांनी खाली कोसळला. मागच्या तीन दिवसात शेअर
बाजारात जी घसरण झालीय त्यामुळे गुंतवणूकदारांचे तब्बल 9.6 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. सकाळी 1,274 अंकांची घसरण झाल्यामुळे सेन्सेक्स दीड
महिन्यांपूर्वीच्या 33,482 या निचांकी
पातळीला पोहोचला, तर निफ्टीचीही 10,276.30 च्या पातळीपर्यंत घसरण झाली. 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर 30 शेअर्सच्या इंडेक्समध्ये 2,164.11 अंकांची घसरण झाली आहे. शेअर बाजारात शेअर्सची
जी विक्री सुरु आहे त्यामुळे बीएसई नोंदणीकृत कंपन्यांच्या बाजारमुल्यामध्ये 9 लाख 60 हजार 938 कोटींची घट झाली
आहे.
___________________
अनुपम खेर, राम माधव यांचे अकाउंट हॅक
राष्ट्रीय
चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेचे (एफटीआयआय) अध्यक्ष अनुपम खेर, भाजपाचे सरचिटणीस राम माधव, राज्यसभा खासदार स्वपन दासगुप्ता यांचे ट्विटर
अकाउंट हॅक झाले असून ट्विटरने अकाउंट हॅक झाल्याचे समजल्यानंतर सुरक्षेच्या
दृष्टीकोनातून या तिघांचेही अकाउंट सस्पेंड केले आहे. याबाबतची माहिती अनुपम खेर
यांनी स्वतःच दिली. माझे ट्विटर अकाउंट हॅक झाले असून सध्या मी लॉस एंजेलिसमध्ये
आहे, भारतातील माझ्या काही
मित्रांकडून मला याबाबत समजले, मी ट्विटरला
याबाबत कळवले असल्याचे अनुपम खेर म्हणाले. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार हॅकर्सनी
स्वतःला तुर्की येथील असल्याचे म्हटले आहे. तुर्की येथील सायबर आर्मी आयदिस तिम
द्वारा तुमचं अकाउंट हॅक करण्यात आले आहे. आम्ही तुमचा महत्वाचा सर्व डेटा मिळवला
असल्याचे ट्विट हॅकर्सनी त्यांच्या अकाउंटवरून केले. पण ट्विटच्या अखेरीस ‘आय लव्ह पाकिस्तान’ असे लिहिण्यात आले होते.
____________________
५० लाख कर्मचाऱ्यांना मिळू शकते सातवे वेतन आयोग
केंद्रीय
कर्मचाऱ्यांसाठी सरकार आंनदाची बातमी आहे. कारण मोदी सरकार लवकरच त्यांच्या
पगारामध्ये घसघशीत वाढ करणार आहे. याचा फायदा 50 लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे. एप्रिल 2018 मध्ये
अर्थमंत्री अरुण जेटली याची घोषणा करण्याची शक्यता आहे. सातव्या वेतन
आयोगासाठी केलेल्या शिफारसीनुसार केंद्र सरकार सातवा वेतन आयोग वाढवण्यासाठी
प्रयत्न करत आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार कर्मचाऱ्यांची वाढणारी पगार येणाऱ्या
आर्थिक वर्षापासून लागू करण्यात येणार आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काही
दिवसापूर्वी पगारवाढ करण्याचे आश्वासन दिलं होतं. जर मोदी सरकार कर्मचाऱ्यांचा
पगार वाढवणार असतील तर कमीत कमी त्यांचा पगार 24000 रुपये होणार आहे. याची अधिकृत घोषणा झालेली नाही. केंद्रीय
कर्मचारी मॅट्रिक्स लेवल 1-2मध्ये येतात.
त्यांचीच पगारवाढ होणार आहे.
__________________
अर्थसंकल्पामुळे महाग झाला आयफोन
२०१८-१९च्या
अर्थसंकल्पात स्मार्टफोनवरील कस्टम ड्युटी वाढवण्याचा निर्णय अर्थमंत्री अरुण
जेटली यांनी घेतला असून आयफोनच्या किमतींमध्ये त्यांच्या या घोषणेने बराच फरक पडला
आहे. अॅपलने अर्थसंकल्पानंतर चार दिवसांनी आपल्या आयफोनच्या किमतीत ३ ते ६
टक्क्यांनी वाढ केली आहे. पण भारतात तयार होणाऱ्या आयफोन SEच्या किंमतीत काहीही फरक पडलेला नाही. आयफोन येत्या काळात
आणखी महाग होण्याची शक्यता आहे. कारण की, एप्रिल महिन्यापासून नवी कस्टम ड्युटी लागू होईल. त्यामुळे आयफोनच्या किमतीत
वाढ होईल.
____________________



