जिओ कॅप्सूल : ५ मिनटात वाचा ठळक बातम्या थोडक्यात
गुजरातमध्ये सहाव्यांदा भाजपाची सत्ता गुजरातचा गड सलग सहाव्यांदाच राखतांना भाजपची चांगलीच दमछाक झाल्याचे दिसून आले. 182 जागांच्या विधानसभेत भाजपने 99 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले. 2012 च्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा भाजपला 16 जागांचा फटका बसला आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला सत्तांतर करण्यात अपयश आले असले तरी 2012 च्या तुलनेत प्रभावी कामगिरी करतांना 80 जागा खिशात घातल्या. 2012 च्या तुलनेत काँग्रेसला जवळपास 20 जागा जास्त मिळाल्या आहेत. भाजपच्या पारड्यात 49.1 टक्के मते पडली असून 2012 साली ही टक्केवारी 48 होती. 2012 साली 39 टक्के मते मिळालेल्या काँग्रेसला यंदा 41.4 टक्के मते मिळाली असून हे देखील राहुल गांधीच्या बदललेल्या प्रतिमेचे प्रतिक मानले जात आहे. भाजपचे शहरांतील मतदारांनी तारले तर ग्रामीण गुजरातने काँग्रेसला हात दिल्याचे चित्र आहे. _____________________ हिमाचलमध्ये काँग्रेसवर मात करत भाजपची सत्ता हिमाचल प्रदेश मध्ये ९ नोव्हेंबर रोजी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी सकाळी ८ वाजता पासून करण्यात आली. ६८ जागांच्या विधानसभेत ४४ ...