जिओ कॅप्सूल : ठळक बातम्या वाचा ५ मिनटात
राहुल गांधींच्या हिंदुत्वावर राजकारण
गुजरात
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी बुधवारी सोमनाथच्या दौऱ्यावर होते. त्यांना
पक्षाच्या कार्यकर्त्यांसह सोमनाथाचं दर्शन घेऊन पूजाही केली. यावेळी सर्व कार्यकर्त्यांचा
नोंद ही हिंदू रजिस्टरमध्ये करण्यात आली तर राहुल गांधी आणि आणि अहमद पटेल यांच्या
नावाची नोंद गैरहिंदू रजिस्टरमध्ये करण्यात आली. त्यांची नोंद गैर हिंदू रजिस्टरमध्ये
केली असल्याने नव्या वादाला तोंड फुटले. यावरून भाजपानेत्यांनी राहुल गांधींवर टीकेचा
वर्षाव केला. तर काँग्रेसपक्षाने ती नोंद स्वतः राहुल गांधी यांनी केली नसून ती एका
सहकार्याने केली व ती चुकून करण्यात आली आहे असे पक्ष मांडले. भाजपा या छोट्याशा मुद्द्याला
ताणून धरून घाणेरडे राजकारण खेळात असल्याचीही टीका काँग्रेसनेंत्यानी केली आहे.
कोपर्डी बलात्कार आणि हत्याप्रकरणातील तीनही आरोपींना फाशी
महाराष्ट्रासह
संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या कोपर्डी खून व अत्याचार प्रकरणाचा बुधवार २९ नोव्हेंबर
रोजी निकाल लागला. या प्रकरणातील तिन्ही आरोपी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात
आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या
केल्याची घटना घडली होती. समाजमन हेलावून टाकणाऱ्या
या घटनेनंतर दोषींना कठोर शिक्षा करण्याची मागणी सर्वच स्तरातून करण्यात येत होती.
या निर्णयाचे संपूर्ण राज्यभरात स्वागत झाले असून मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
याबाबत आनंद व्यक्त केला. तसेच अजित पवार यांनी लवकरात लवकर शिक्षेची अंमलबजावणी व्हाव्ही
अशी मागणी केली. बुधवारी कोर्टाने अवघ्या ६ मिनटांमध्ये हा निकाल जाहीर करण्यात आला
होता.
____________________________________
रस्ते अपघातांमधील मृतांच्या आकड्यात घट
गेल्या
वर्षीच्या तुलनेत रस्ते अपघातांमुळे होणाऱ्या लोकांच्या मृत्यूच्या आकडेवारीत मोठी
घट झाली आहे. यंदाच्या वर्षातील पहिल्या नऊ महिन्यांमध्ये (जानेवारी ते सप्टेंबर) गेल्या
वर्षीच्या तुलनेत रस्ते अपघातातील मृतांचा आकडा ५ हजारांनी घटली असल्याची आकडेवारी
सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या रस्ते सुरक्षा समितीला राज्य सरकारांनी दिलेल्या
माहितीमधून समोर आली आहे. राज्य सरकारांनी रस्ते अपघातांमधील मृतांची आकडेवारी दिलेल्या
माहितीवरुन समोर आली आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या माहितीवरून टक्केवारीनुसार
पहिल्या क्रमांकावर पंजाब आहे. त्यानंतर पश्चिम बंगालचा क्रमांक लागतो. महाराष्ट्रत अपघातातील मृतांचा घटलेला आकडा लक्षात घेतल्यास
अव्वल स्थानावर आहे. यंदाच्या वर्षात महाराष्ट्रात रस्ते अपघातातील मृतांची संख्या
८०७ ने कमी झाली आहे. यानंतर गुजरात दुसऱ्या क्रमांकावर आहे. गुजरात रस्ते अपघाताताली
मृतांची संख्या ७७५ ने कमी झाली आहे.
____________________________________
इव्हांका ट्रम्पला मिळाल्या अनेक भेट वस्तू
जागतिक
उद्योजकता शिखर परिषदेसाठीअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इव्हांका
ट्रम्प हैदराबादमध्ये आली होती. इव्हांका ट्रम्पचे तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के.
चंद्रशेखर राव यांनी खास स्वागत केले असून तिला चांदीच्या दागिन्यांनी मढवलेली साडी
भेट दिली. या साडीची किंमत चक्क ४० लाख रुपये असून १२० कुटुंबातील कारीगरांनी साडी
बनविण्याचे काम गेल्या दोन महिन्यापासून केले असून त्यावर चांदीच्या दागिन्यांचे नक्षीकाम
आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील एक सुंदर लाकडी पेटी भेट दिली आहे. ही
पेटी गुजरातच्या सॅडली हस्तकलेचा उत्तम नमुना आहे. तसेच राज्य सरकारकडून इव्हांकाला
2.5 किलो चांदीचा चारमिनार आणि 1.5 किलो चांदीचा राजहंसांची प्रतिमा भेट करण्यात आली आहे.
____________________________________
हापूसची पहिली पेटी बाजारात दाखल; ९ हजाराला झाली विक्री
फळांचा
राजा म्हणून ओळख असलेला देवगडचा हापूस आंबा यावर्षी नोव्हेंबरमध्येच मुंबईच्या कृषी
उत्पन्न बाजार समितीच्या फळ बाजारात दाखल झाला. वर्षाच्या हंगामातील कोकणातील हापूसची
पहिली पाच डझनची पेटी ९ हजारांना विकली गेली. देवगडमधील प्रकाश शिरसेकर या शेतकर्याने
ही पहिली पेटी बाजारात पाठवली होती. दरवर्षी डिसेंबर-जानेवारी दरम्यान हापूसची पहिली
पेटी बाजारात येत असते. मात्र, यावर्षी नोव्हेंबरमध्येच
हापूस आंबा बाजारात दाखल झाला आहे. पाच डझनच्या पेटीला नऊ हजार रुपये दर मिळाला आहे.
पहिली पेटी नोव्हेंबरमध्ये दाखल झाल्याने शेतकरी तसेच व्यापार्यांमध्ये आनंदाचे वातावरण
आहे. सोमवारी ही पेटी विकली गेल्यानंतर व्यापार्यांनी पेढे वाटून आनंद साजरा केला.
____________________________________


