१६ डिसेंबरच्या ठळक घडामोडी थोडक्यात
कॉंग्रेसलाही सावरकरांचा आदर, पण...
काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह्य विधानाबाबत देशभरातुन तिव्र प्रतिसाद उमटत आहेत. यावर आता कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, ३० ऑगस्ट १९११ सालाच्या सावरकरांबाबत आम्हाला आदर आहे. पण त्यानंतर सावरकर यांच्या विचारात बदल होत गेले आणि ते बदल आम्हाला मान्य नाहीत.
दरम्यान हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी फडणवीसांसह नेते मंडळींनी डोक्यावर भगव्या रंगाची 'मी पण सावरकर' लिखित टोपी घालून विधानभवनात प्रवेश केला. भाजप सावरकरांचा उपयोग हा राजकीय फायद्यासाठी करत असल्याचा आरोप देखील यावेळी सचिन सावंतांनी केला. त्याचबरोबर सावरकरांचे नातू रंजीत यांना त्यांच्याबद्दल काही माहित नसल्याचेही सावंत म्हणाले.
***************
अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या शिवस्मारकावरुन राजकारणार आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक प्रकरणात चंद्रकांत पाटील यांनी पैसे खाल्ले असा आरोप राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्षांवर केला. ते पुढे म्हणाले चंद्रकांत पाटीलांनी शिवस्मारकात पैसे खाल्ल्याचे सिद्ध करून दाखवू, तसेच शिवस्मारकासंदर्भात वरिष्ठ अधिकारी वर्क ऑर्डर द्यायला तयार नव्हते. कनिष्ठ अधिकाऱ्यांनी वर्क ऑर्डर दिली होती. कॅगच्या अहवालातही गैरव्यवहार झाल्याचे ताशेरेही त्यांनी ओढले
यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अधिवेशना पूर्वी माध्यमांसमोर येऊन नवाब मलिक यांना सडेतोड उत्तर दिले. पाटील म्हणाले, शिवस्मारकाच्या निविदा प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार झाला नसून तर चौकशी लावून शिवस्मारकाचा प्रकल्प रेंगाळत ठेवण्याचा सरकारचा डाव आहे, असा पलटवार चंद्रकांत पाटील यांनी केला.
यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अधिवेशना पूर्वी माध्यमांसमोर येऊन नवाब मलिक यांना सडेतोड उत्तर दिले. पाटील म्हणाले, शिवस्मारकाच्या निविदा प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार झाला नसून तर चौकशी लावून शिवस्मारकाचा प्रकल्प रेंगाळत ठेवण्याचा सरकारचा डाव आहे, असा पलटवार चंद्रकांत पाटील यांनी केला.
***************
दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राचा सुपुत्र शहीद
जम्मू-काश्मीरच्या राजुरी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण आले. जोतिबा चौगुले असे त्याचे नाव आहे. ३६ वर्षीय जवान मुळचा कोल्हापूर येथिल गडहिंग्लजचा रहिवासी आहे.
सोमवारी पहाटे ३.०० वाजण्याच्या सुमारास राजुरी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत जोतिबा चौगुले हे शहीद झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी महागाव येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. जोतिबा चौगुले जम्मू काश्मीरच्या राजुरी सेक्टरमध्ये मराठा बटालियनमध्ये कार्यरत होते, अशी प्राथमिक माहिती आहे. ही बातमी समजताच चौगुले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून महाराष्ट्रात सर्वत्र शोककळा पसरली आहे.
***************
थेट जनतेतून लोकनियुक्त सरपंच, नगराध्यक्ष निवड होणार बंद

भाजप सरकारने घेतलेले महत्वाचे निर्णय महाराष्ट्र विकास आघाडी सरकार बदलणार आहे. जनतेतून थेट नगराध्यक्ष, सरपंच निवडण्याची पद्धत रद्द केली जाणार आहे. पूर्वीप्रमाणे नगरसेवक नगराध्यक्ष निवडतील, तर ग्रामपंचायत सदस्य सरपंच निवडणार, अशी पद्धत पुन्हा लागू होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. अनेक नगरपालिकांमध्ये सत्ता एका पक्षाची तर नगराध्यक्ष दुसर्या पक्षाचा निवडून आलेला आहे, त्यामुळे सत्ता राबवताना गोंधळ होतोय, नगरसेवक नगराध्यक्षाला सहकार्य करत नाहीत. म्हणून हा निर्णय बदलला जात आहे.
मुंबई वगळता सर्व महापालिका आणि नगरपालिकांमधील चार प्रभाग पद्धत रद्द करणार आहेत. पूर्वीप्रमाणे एक प्रभाग पद्धत लागू करण्यासाठी महाविकास आघाडीच्या हालचाली सुरू आहेत. याबाबत सरकार लवकरच निर्णय घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे. फेब्रुवारी 2016 मध्ये भाजप सरकारने हे दोन्ही निर्णय घेतले होते, पण उद्धव ठाकरे सरकार ते बदलणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
***************
अक्षय कुमार पुन्हा एकदा वादात
नागरिकता दुरुस्ती कायदा 2019 च्या (Citizenship Amendment Act 2019) विरोधात रविवारी जामिया नगर आणि जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात हिंसाचाराच्या घटना घडल्या. अक्षय कुमारने त्याच्या ट्विटर हँडलवरून जामियामधील या हिंसाचाराची थट्टा करणारे एक ट्विट लाईक केलं. मात्र सोशल मीडियावर त्याच्या या वागण्याचे उलट पडसाद उमटले. ट्रोल झाल्यानंतर अक्षयने लगेच ट्वीटवरून लाईक काढून टाकलं.
या हिंसाचाराचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पोलीस आणि विद्यार्थ्यांमधील हिंसाचारामुळे देशभरात संताप व्यक्त होत आहे. इतकंच नाही तर #BoycotCanadianKumar या नावाचे हॅशटॅगही ट्विटरवर ट्रेंड होत आहे. अशा परिस्थितीत बॉलिवूडच्या अनेक स्टार्सनी याला विरोध केला. चुकुन लाईक केलेल्या ट्विटवर अक्षयने स्पष्टिकरणही दिले, 'जामिया मिलिया विद्यार्थ्यांशी संबंधित ट्विट माझ्याकडून चुकून लाईक झालं. चुकून माझ्याकडून लाईकचं बटन दाबलं गेलं. मला हे समजताच मी लगेचच ते दुरुस्त केलं. कारण मी कोणत्याही प्रकारे हिंसेचे समर्थन करत नाही.’
***************




Comments
Post a Comment