२६ ऑक्टोबरच्या ठळक बातम्या थोडक्यात

इसिसमध्ये भरती झालेल्या कल्याण मधील तरुणाचा मृत्यू



रक्का येथील दहशतवादाविरोधातील कारवाई दरम्यान इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेत भरती झालेल्या कल्याणचा फहाद तन्वीर शेख या तरुण ठार झाला असल्याची ही माहिती फहादच्या कुटुंबियांना निनावी फोनद्वारे देण्यात आली आहे. मंगळवारी परदेशातील मोबाईल क्रमांकावरुन अज्ञात व्यक्तीने फहाद शेखच्या आईला फोन केला. फहादचा सीरियातील रक्का येथे कारवाईदरम्यान मृत्यू झाल्याची माहिती त्या व्यक्तीने दिली. फहादच्या आईला हे ऐकून धक्का बसला. फहादचा कुठे मृत्यू झाला याची माहितीदेखील त्यांनी घेतली नाही, असे फहादच्या नातेवाईकांनी सांगितले. फहादच्या वडिलांनी फोन आल्यानंतर या फोन कॉलविषयी राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) माहिती दिली. हा फोन कुठून आला होता, याचा शोध एनआयएचे पथक घेत आहेत. २०१४ मध्ये कल्याणमधील फहाद शेख, अमन तांडेल, सहिम तानकी, आरिफ मजीद हे चार तरुण इसिसमध्ये सामील होण्यासाठी इराकला गेले होते. यातील अमन तांडेल आणि सहिम तानकी या दोघांचा मृत्यू झाला आहे. तर आरिफ माजिद हा तरुण भारातात परतला असून त्याला एनआयएने अटकही केली आहे.
___________________________________________

अमिताभ बच्चन यांना बीएमसीने दिली नोटीस

हन्मुंबई महानगरपालिकेने महानायक अमिताभ बच्चन यांच्यासह जणांना अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी नोटीस पाठविली आहे. ही नोटीस एमआरटीपी कायद्याअंतर्गत बजाविण्यात आली असल्याची माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी ही माहिती दिली. त्यांना ही नोटीस गोरेगावमधील बच्चन यांच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामप्रकरणी बजाविण्यात आली असून त्यांच्यावर महापालिकने मंजूर केलेल्या आराखड्यात बदल करून अनधिकृत बांधकाम केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या संदर्भातील माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मागवली होती. दरम्यान, गलगली यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालिका आयुक्त अजॉय मेहता यांना पत्र पाठवून जणांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान महापालिकेने अमिताभ बच्चन यांच्यासह राजकुमार हिरानी, पंकज बालाजी, संजय व्यास, हरेश खांडेवाल, हरेश जगठणी, ओबेरॉय रिअॅल्टी यांना देखील नोटीस पाठवली आहे.
___________________________________________

स्टॅम्प घोटाळ्यातील अब्दूल करीम तेलगीचा मृत्यू

बनावट स्टॅम्प घोटाळ्यातील मुख्य आरोपी आणि सूत्रधार अब्दुल करीम तेलगी यांचा अवयव निकामी झाल्यामुळे गुरुवारी मृत्यू झाला. ते बऱ्याच दिवसांपासून व्हेंटिलेटर वर होते त्यांची प्रकृती गंभीर होती. तेलगी हा बंगळुरूतीला व्हिक्टोरीया हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता. अब्दूल करीम तेलगी हा बंगळुरूच्या सेन्ट्रल जेलमध्ये स्टॅम्प घोटाळा प्रकरणी शिक्षा भोगत होता. तेलगीने हजारो करोडो रूपयांचे बनावट स्टॅम्प छापून चूना लावला होता, मात्र त्याची शिक्षाही अब्दूल करीम तेलगीला भोगावीच लागली. एकदा 2016 मध्ये अब्दूल करीम तेलगी हा जिवंत असून तो बंगळुरूच्या जेलमध्ये बंद असल्याचा पुरावा, सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात सादर केला होता. तेलगीला स्टॅम्प घोटाळ्यात निर्दोष असल्याचा निर्णय आल्यानंतर सीबीआयने या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तेलगी विरोधात डझनवार बनावट स्टॅम्प बनल्याचे गुन्हे दाखल होते. तसेच तेलगीचा अंत हा शिक्षा भोगत असतानाच झाला. अब्दुल करीम तेलगीला जीवघेणा आजार असल्याच्या अफवाही मध्यंतरी आल्या होत्या.
___________________________________________

वांद्रे स्टेशनजवळ भीषण आग

मुंबईत वांद्रे रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या बेहरामपाडयातील झोपडपट्टीला भीषण गुरुवारी आग लागली. आगीने रौद्ररुप धारण केले वांद्रे स्टेशनच्या तिकिट काऊंटरपर्यंत ही आग पसरली. अतिक्रमणविरोधी पथकाची कारवाई सुरु असताना एका झोपडीत सिलेंडरचा ब्लास्ट झाल्याने ही आग लागल्याची चर्चा होती. अग्निशमन दलाच्या बारा गाडया घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. बराच वेळ या आगी मुले लोकल ट्रेन बंद झाल्या होत्या मात्र अग्निशमन दलाने आजवर नियंत्रण मिळविल्यानंतर त्या सुरु करण्यात आल्या. बेहरामपाडयामध्ये झोपडपट्टीला आग लागण्याची ही पहिली वेळ नाहीय. यापूर्वी सुद्धा इथे झोपडपट्टीला आग लागली आहे. या परिसरात अनधिकृत बांधकाम मोठया प्रमाणावर असून अनेक झोपडया वांद्रे रेल्वे स्टेशनला लागून आहेत.
___________________________________________

जवान चंदू चव्हाण कोर्टमार्शलमध्ये दोषी

सर्जिकल स्ट्राईकदरम्यान चुकून नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात गेलेल्या आणि परत भारतात आणलेल्या जवान चंदू चव्हाण यांना लष्करी न्यायालयाने गुरुवारी दोषी ठरवले आहे. दोषी ठरल्यानंतर तीन महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. भारताने २०१६ मध्ये पाकव्याप्त काश्मिरात केलेल्या सर्जिकल स्ट्राईकदरम्यान अनावधानाने नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात गेलेले भारतीय जवान चंदू चव्हाण यांना लष्करी न्यायालयाने नियंत्रण रेषा ओलांडल्याप्रकरणी चंदोषी ठरविले आहे३७ राष्ट्रीय रायफल्समधील जवान चंदू चव्हाण हे  नजरचुकीने पाकिस्तानात पोहोचले होते. २९ सप्टेंबर २०१६ रोजी त्यांनी नियंत्रण रेषा ओलांडली होती. सूत्रांच्या माहितीनुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांवर नाराज होऊन चंदू चव्हाण पाकिस्तानात गेले होते. मात्रयानंतर भारतानं सर्वोतोपरी प्रयत्न करत त्यांना २१ जानेवारीला पुन्हा मायदेशी सुखरुप आणले होते. या प्रकाराबाबत गुरुवारी त्यांना दोषी ठरविण्यात आले.
___________________________________________



Popular posts from this blog

जिओ कॅप्सूल : ५ मिनटात वाचा ठळक बातम्या थोडक्यात

Top stories on 23rd October in a capsule