जिओ कॅप्सूल : ५ मिनटात वाचा ठळक बातम्या थोडक्यात



नवी मुंबई महापालिकेवर आयकर विभागाची धाड 


आयकर विभागाच्या नजरेतून शासकीय कार्यालयेसुद्धा वंचित राहिले नसल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. जीएसटीबाबत आयकर विभागाच्या 12 अधिकाऱ्यांनी नवी मुंबई महापालिकेवर धाड टाकली आहे. आयकर विभागानं मंगळवारी सकाळी धाड टाकली होती. ठेकेदारांनी जीएसटी योग्य प्रकारे भरणा केला का याचीही तपासणी करण्यात आली. मंगळवार सकाळ पासून बुधवारी पहाटे पर्यंत तपास सुरू होता. महापालिकेचे मोठे ठेकेदार आणि अधिकारी आयकर विभागाच्या रडारवर असल्याचे समजते. बुधवारी सकाळी महापालिकेच्या अकाउंट्स विभाग, नगररचना विभाग आणि शहर अभियंता विभागावर धाडी घातल्या आहे. यावेळी 100 कोटींच्या वरील कामांच्या सर्व फायलींची तपासणी करण्यात आली. महापालिकेचे मोठे ठेकेदार आणि अधिकारी आयकर विभागाच्या रडारावर आहेत.
_____________________


मुख्यमंत्र्यांच्या जीवाला धोका : प्रकाश आंबेडकर



संभाजी भिडेंच्या निकटवर्तीयानं मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याचं आव्हान फेसबुकवर केल्याची धक्कादायक माहिती भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एका पत्रकार परिषदेत उघड केली. रावसाहेब पाटील असे त्याचे नाव आहे. ही माहिती पोलिसांना असूनही पोलिसांनी ती मुख्यमंत्र्यांपासून लपवली असल्याचा आरोपही प्रकाश आंबेडकरांनी यावेळी केला. हिंदुत्ववादी संघटनांमध्ये आता वर्चस्ववादाची लढाई सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती पुण्याच्या पोलीस आयुक्तांना, अतिरिक्त पोलीस आयुक्त, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि पुण्याच्या गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुखांना आहे. मात्र त्यांनी ही माहिती मुख्यमंत्र्यांपासून लपवली आहे. या अधिकार्‍यांवर कारवाई करायला हवी, अशी मागणी आंबेडकरांनी यावेळी केली.
_____________________


मोजो पबचा मालक युग टुलीला हैदराबादेतून अटक



मुंबईच्या कमलामिलमध्ये लागलेल्या भीषण आगीप्रकरणी मोजोस रेस्टॉरंटचा मालक यूग टुलीला हैदराबाद पोलीसांनी अटक केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. २९ डिसेंबरला मोजोस रेस्टोरंटमध्ये लागलेल्या आगीत १४ जणांचा बळी गेला. त्यानंतर रेस्टोरंटच्या मालकांवर सदोष मुनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. युग टुली पहिल्या दिवसापासूनच फरार होता. मंगळवारी संध्याकाळी तो हैदराबादमध्ये असल्याचं पुढे आल्यावर बुधवारी त्याला हैदराबादमधून अटक करण्यात आली. मुंबई विशेष सत्र न्यायालयाने युग टुलीच्या अटकपूर्व जामीन अर्जावर बुधवारी सुनावणी घेण्यास नकार दिला. ११ जानेवारीला युग टुलीच्या अटक पूर्व जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयाने सुनावणी ठेवण्यात आली आहे.
_____________________


सॅनिटरी नॅपकिनला टॅक्सफ्री करण्यासाठी महिलांचे अनोखे अभियान



ग्वालियरमधील महिलांनी सॅनिटरी नॅपकिनला टॅक्स फ्री करण्यासाठी एक अभियान सुरू केले असून सॅनिटरी नॅपकिन्सवर केंद्र सरकारने जीएसटी लावण्याबाबत घोषणा केल्यानंतर काही महिलांनी पुढाकार घेऊन त्याला विरोध करण्यासाठी अभियान राबवले आहे. १ हजार सॅनिटरी नॅपकिन्सवर या अभियानाअंतर्गत संदेश लिहून हे नॅपकिन्स पंतप्रधान मोदींना पाठवण्यात येणार आहेत.अनेक गरीब महिला सॅनिटरी नॅपकिन्सचे दर अधिक असल्याने ते विकत घेऊ शकत नाही. त्यातून हे दर जीएसटी लावल्यानंतर आणखी वाढतील त्यामुळे काही महिला त्या खरेदी करू शकत नाहीत. तेव्हा एकतर त्यांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्स देण्यात यावे किंवा त्यावर लावण्यात आलेला जीएसटी रद्द करावा अशी मागणी प्रिती जोशी यांनी केली आहे. या अभियानात त्यांच्याही सहभाग मोठा आहे.
_____________________


निवडणूक आयोगाला सक्षम करणारे शेषन वृद्धाश्रमात




लोकसभा, विधानसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका असोत. या निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाला सक्षम बनवणाऱ्यांमध्ये टीएन शेषन यांचं नाव नेहमीच पुढे येतं. पण हेच ८५ वर्षीय शेषन आता वृद्धाश्रमात आहेत. ९० च्या दशकामध्ये शेषन हे निवडणूक आयोगाचे आयुक्त होते. सध्या शेषन चेन्नईच्या ओल्ड एज होममध्ये आहेत. शेषन यांना विसरण्याचा आजार झाला आहे. शेषन हे सत्य साईबाबांचे भक्त होते. सत्य साईबाबांच्या मृत्यूनंतर त्यांना धक्का बसला, यानंतर त्यांना वृद्धाश्रमात दाखल करण्यात आलं. तीन वर्ष वृद्धाश्रमात राहिल्यावर शेषन यांना घरी नेण्यात आलं. पण काही काळ घरी राहिल्यावर पुन्हा एकदा ते वृद्धाश्रमात आले आहेत.
_____________________


Popular posts from this blog

जिओ कॅप्सूल : ५ मिनटात वाचा ठळक बातम्या थोडक्यात

Top stories on 23rd October in a capsule