जिओ कॅप्सूल : ५ मिनटात वाचा ठळक बातम्या थोडक्यात



अखेर तिहेरी तलाक प्रतिबंधक विधेयक लोकसभेत सादर




सर्वोच्च न्यायालयाने तिहेरी तलाक बेकायदेशीर आणि घटनाबाह्य ठरवल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने याबाबतचे विधेयक गुरुवारी लोकसभेत सादर केले. केंद्रीय कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी हे विधेयक सादर करण्याआधीच काही सदस्यांनी याला विरोध केला. तिहेरी तलाक बेकायदेशीर ठरवणाऱ्या आणि पीडितेला न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार देणारे हे विधेयक कोणत्याही पक्षाचे नसून महिलांच्या सन्मानासाठी असल्याचे प्रसाद यांनी स्पष्ट केले. तसेच मुस्लिम महिलांना नक्की कसा फायदा होईल, याबाबत विधेयकात कोणताही उल्लेख नाही. तसेच कायद्याचे उल्लंघन केलेल्या पतीला शिक्षा झाल्यानंतर त्या कुटुंबीयांची काळजी कोण घेणार याचा विचार करण्यात आलेला नाही, अस विरोध काँग्रेसने दर्शविला आहे.
___________________________


विदर्भ, मराठवाडा पुढील ४८ तासात थंडीची लाट



विदर्भ, मराठवाडा काही भागात पुढील ४८  तासात थंडी लाट असण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेने वर्तविली आहे. गेल्या ४८  तासांपासून विदर्भात थंडीची लाट असून गुरुवारी रात्री  गोंदीयात निच्चांकी ७.८ अंश सेल्सिअस तापमानची तर नागपुरात ८.४ अंश सेल्सिअसपर्यंत  तापमानची नोंद झाली आहे. थंडीमुळे विदर्भात चांगलीच  हुडहुडी भरली आहे. दरम्यान थंडीच्या कडाक्यामुळे नागपुरात हुडकेश्वर परिसरात एकाला प्राणही गमवावे लागले आहे. हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुधाकर पिलपिले हे ६३ वर्षीय वयोवृद्ध बंद दुकानाजवळ बुधवारी सकाळी मृत अवस्थेत आढळले. थंडीने त्यांचा बळी घेतल्याची शक्यता व्यक्त होत आहे. पोलिसांनी मात्र याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
___________________________


कुलभूषण जाधव बाबत सुषमा स्वराज पाकिस्तानविरोधात गरजल्या



हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानच्या कैदेत असणारे कुलभूषण जाधव आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या भेटीसंदर्भात परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी राज्यसभेत निवेदन दिले. या भेटीत पाकिस्तानने मानवाधिकाराचे उल्लंघन केल्याचे स्वराज यांनी सभागृहात सांगितले. इतक नव्हे तर पाकने मुलाखतीच्या अटींचा भंग केल्याचे त्यांनी सांगितले. जाधव आणि त्यांच्या कुंटुबीयांच्या भेटी दरम्यान पाकिस्तानने केलेल्या खोडसाळपणाबद्दल बुधवारी दिवसभर झालेल्या वादानंतर आज स्वराज यांनी याबाबत संसदेत निवेदन दिले. या भेटीचा पाकने केवळ प्रपोगंडासाठी वापर केल्याचे स्वराज यांनी सांगितले. याबाबत दोन्ही देशांमध्ये असा स्पष्ट करार झाला होता की जाधव यांच्या कुटुंबीयांना मीडियाच्या जवळ आणले जाणार नाही. पण प्रत्यक्षात पाक मीडियाने त्यांना टोमणे मारले. त्यांच्यावर खोटे आरोप केले, असे हि सुषमा स्वराज म्हणाल्या.
___________________________ 


राज्यात २२ भ्रष्ट मंत्र्यांना क्लिनचिट : जयंत पाटील



भाजप सरकारच्या अस्थिरपणाचे आणि भाजप-शिवसेनेमधील अविश्‍वासाच्या वातावरणाचे रहस्य राष्ट्रवादीने राज्य सरकार स्थापनेवेळी या सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याच्या निर्णयामध्ये आहे, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांनी पत्रकार बैठकीत केला. सरकारमधील २२ मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप असून देखील मुख्यमंत्र्यांकडून त्यांना क्‍लीन चिटदिली जात असल्याचेही आमदार पाटील यांनी म्हटले आहे. 22 मंत्र्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होवूनही मुख्यमंत्र्यांनी त्यांना क्‍लिन चीट दिली आहे. प्रकाश मेहता यांच्यावर प्रथमदर्शनी भ्रष्टाचाराचे आरोप होवूनही त्यांच्यावर कारवाई झाली नाही. लोकायुक्तांनी त्यांच्यावर ठपका ठेवला. अशा मंत्र्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, असा आरोप आमदार पाटील यांनी केला. 
___________________________ 

भारताच्या इंटरसेप्टर मिसाईलची यशस्वी चाचणी



                                       

आपल्या देशावर येणाऱ्या क्षेपणास्त्राला क्षेपणास्त्राच्या माध्यमातून नष्ट करणाऱ्या क्षेपणास्त्राची भारताने यशस्वी चाचणी घेतली आहे. याबाबत माहिती देताना संरक्षण मंत्रालयाने सांगितले, क्षेपणास्त्राला स्टारवॉर असे नाव देण्यात आले आहे. या क्षेपणास्त्राच्या माध्यमातून आपल्यावर हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या क्षेपणास्त्राला शत्रूच्या हद्दीतच नष्ट करण्याची ताकत या क्षेपणास्त्रात आहे. ही यशस्वी चाचणी सकाळी 9:45 च्या सुमारास ओडिशाच्या महासागरामध्ये व्हियेलर बेटावर (आता ज्याला अब्दुल कलाम बेट म्हणतात) घेण्यात आली. जेथे स्वदेशी बनावट असलेले इंटरसेप्टर क्षेपणास्त्र हल्ला करण्यास येणाऱ्या क्षेपणास्त्राला नष्ट केले. अत्याधुनिक वायु-संरक्षण यंत्रणेची ही नववी चाचणी होती, ज्या अंतर्गत इंटरसेप्टर क्षेपणास्त्राला व्हियेलर आयलंडवरून सोडण्यात आले आणि त्याने बंगालच्या उपसागरात आक्रमण करण्यासाठी आलेल्या क्षेपणास्त्राला जमिनीपासून १५ किलोमीटर अंतरावर नष्ट केले.
___________________________


Popular posts from this blog

जिओ कॅप्सूल : ५ मिनटात वाचा ठळक बातम्या थोडक्यात

Top stories on 23rd October in a capsule