३ ऑक्टोबरच्या ठळक बातम्या थोडक्यात

श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला


श्रीनगरमध्ये सुरक्षा दलाच्या कॅम्पवर मंगळवारी सकाळी दहशतवाद्यांचा हल्ला झाला आहे. भारतीय जवानांनी या हल्ल्यातील तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले मात्र यात १ भारतीय जवान शाहिद झाला असून २ जवान जखमी झाले आहेत. श्रीनगरमधील हमहमा भागातील सीमा सुरक्षा दलाच्या कॅम्पवर पहाटे 4:30च्या सुमारास बीएसएफच्या 182 बटालियनवर हा हल्ला झाला होता. सकाळपासूनच दहशतवादी आणि भारतीय लष्करात जोरदार चकमक सुरु होती. सुरक्षेच्या कारणास्तव श्रीनगर विमानतळावरील सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. तर श्रीनगर हायवेही बंद करण्यात आल्या होत्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवादी श्रीनगर विमानतळावर हल्ला करण्याच्या हेतूनं आले होते. मात्र भारतीय लष्कराला त्यांची माहिती मिळताच त्यांनी चोख बंदोबस्त केला. त्यामुळे दहशतवाद्यांना विमानतळावर घुसता आलं नाही. या हल्ल्याच्या मागे जैश--मुहम्मद या संघटनेचा हात असल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.
_____________________________________

पेट्रोल, डिझेल रुपयांनी स्वस्

सरकारने पेट्रोल डिझेलवर असणारे मूलभूत उत्पादन शुल् कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता पेट्रोल डिझेल रुपांनी स्वस् मिळणार आहे. मंगळवार मध्यरात्री पासून हे दार लागू होणार असल्याची माहिती अर्थमंत्रालयाकडून देण्यात आली. पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या दरावरून देशात असंतोष आहे. विरोधी पक्षांनीही पेट्रोल दरवाढीवरून सरकारला वारंवार घेरण्याचा प्रयत् केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्चा तेलाचे दर आणि भारतातील पेट्रोल, डिझेलच्या दरातील तफावतीवरून सरकारवर टीका होत होती. नुकतेच पेट्रोलीयम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिवाळी आधी पेट्रोल दार कमी करणार असल्याची माहिती प्रसार माध्यमांना दिली होती. त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकाच्या अर्थमंत्रालयाकडून पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल् कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
_____________________________________

विषबाधा झालेल्या शेतकऱ्यांना लाखांची मदत

शेतातील पिकावर किटकनाशक फवारताना विषबाधा होऊन मृत्यू पावलेल्या १८ शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना सरकारने लाख रूपयांची मदत जाहीर केली आहेराज्य मंत्रिमंडळाच्य मंगळवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्याता आला. शेतातील पिकावर फवारणी करताना या शेतकऱ्यांनी आवश्यक ती काळजी घेतली नाही. त्यामुळे १८ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. तर, तब्बल ५४६ शेतकऱ्यांची स्थिती गंभीर आहे. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी विविध मागण्यांचा ओघ शेतकरी वर्ग नेत्यांनी कडून होत आहे. शेतकऱ्यांना किमान १० लाखांची मदत करावी अशी मागणी आमदार बच्चू कडू यांच्याकडून करण्यात आली होती. तर या शेतकऱ्यांच्या मृत्युप्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने विशेष चौकशी पथकाची (एसआयटी) स्थापना करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
_____________________________________

हनीप्रीत इन्सानला अटक

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीमची दत्तक मुलगी हनीप्रीत इन्सानला मंगळवारी दुपारी अटक करण्यात आली. पंजाब मधील जीरकपूर-पटियाला रोड दरम्यान आत्मसमर्पन करण्याआधीच तिला हरियाणा पोलिसांनी ताब्यात घेतले. तिला बुधवारी पंचकुला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दिल्ली हायकोर्टाने हनीप्रीतचा जामीन अर्ज फेटाळून तिला अत्मसमर्पण करण्यास सांगीतले होते. यानंतर हनीप्रीत पंजाब-हरियाणा हायकोर्टात आत्मसमर्पण करण्याच्या तयारीत होती. मात्र पंचकुलाचे पोलिस आयुक्त . एस. चावला यांनी दिलेल्या माहिती प्रमाणे हनीप्रीत जीरकपूर-पटियाला रोड मार्गे चंदीगडच्या दिशेने जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे एसआटीचे प्रमुख मुकेश यांनी आपल्या टीमसह तिच्या गाडीचा पाठलाग करून तिला अटक केली. २५ ऑगस्टला पंचकुला येथे भडकावण्यात आलेल्या हिंसाचारासंबंधी हनीप्रीतची चौकशी होणार आहे.
 _____________________________________

विजय मल्ल्याला लंडनमध्ये अटक आणि लगेचच जामीन

भारतीय बँकांचे हजार कोटी रुपयांचे कर्ज थकवून परदेशात पसार झालेल्या मद्यसम्राट विजय मल्ल्याला आर्थिक अफरातफर प्रकरणी लंडन येथे मंगळवारी अटक करण्यात आली. मात्र अटक करण्यात आल्यानंतर काही वेळातच विजय मल्ल्याला जामीनदेखील मंजूर करण्यात आला. सक्तवसुली संचलनालयाने केलेल्या विनंतीनंतर ही अटकेची कारवाई करण्यात आली. विजय मल्ल्याला अटक करण्यात येण्याची ही दुसरी वेळ होती. याआधी 13 जून रोजी विजय मल्ल्याला अटक करण्यात आली होती. भारताने विजय मल्ल्याचं भारतात प्रत्यार्पण करण्याची विनंती केल्यानंतर ही अटकेची कारवाई झाली होती. मात्र त्यावेळीही अटक झाल्यानंतर लगेचच जामीन मंजूर झाला होता. स्टेट बँकेसह 17 बँकांनी दिलेले तब्बल 9000 करोड रुपयांचे कर्ज मल्ल्याच्या किंगफिशर एअरलाईन्सने थकवले आहेत.



Popular posts from this blog

जिओ कॅप्सूल : ५ मिनटात वाचा ठळक बातम्या थोडक्यात

Top stories on 23rd October in a capsule