जिओ कॅप्सूल : ५ मिनटात वाचा ठळक बातम्या थोडक्यात



नीरव मोदीच्या ९ गाड्या जप्त



पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी हिरे व्यापारी नीरव मोदीच्या मालमत्ता आणि कंपन्यांवर सीबीआय आणि ईडीकडून छापेमारी सुरूच आहे.  ईडीने नीरव मोदीच्या कोट्यावधी रूपये किंमत असलेल्‍या ९ कार जप्त केल्‍या आहेत. याबरोबरच ७.८० कोटी रुपये किंमतीचे म्युच्युअल फंड आणि शेअर्सही गोठवले आहेत. त्‍याबरोबरच मेहुल चोक्सीच्या ग्रुपशी संबंधित ८६.७२ कोटींचे शेअर्स आणि म्युच्युअल फंड्सही गोठवण्यात आले आहेत. गुरुवारी सकाळी ईडीने ही कारवाई केली. या कारवाईत एक टोयोटा फॉर्च्युनर, एक टोयोटा इनोव्हा, एक रोल्ज रॉयस घोस्ट, दोन मर्सिडिज बेंझ जीएल ३५० सीडीआयएस, एक पोर्शे पनामेरा आणि तीन होंडा या कार जप्त केल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्‍या कारमधील रोल्ज रॉयस कारची किंमत सुमारे ६ कोटी रुपये इतकी आहे. दरम्‍यान, सीबीआयने मंगळवारी नीरव मोदीचे अलिबागमधील अलिशान फार्म हाऊसलाही सील ठोकले होते.

______________________


७ बँकांना गंडवणाऱ्या विक्रम कोठारीला अटक




7 बँकांना गंडा घालणारा रोटोमॅक कंपनीचा मालक विक्रम कोठारी आणि त्याचा मुलगा राहुल यांना सीबीआयनं अटक केलीय. कोठारी पिता-पुत्रावर जवळपास 3 हजार 700 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे. बँकांची कोट्यवधी रुपयांची कर्ज ठकवल्याप्रकरणी सीबीआयने विक्रम कोठारी आणि त्याचा मुलगा राहुल या दोघांची चौकशी सुरू केली होती. मात्र तपासात योग्य ते सहकार्य मिळत नसल्यामुळे सीबीआयनं त्या दोघांना अटक केलीय. विक्रम कोठारीने सर्वात जास्त युनियन बँक आॅफ इंडियाकडून 485 कोटींचं कर्ज घेतलंय.  तसंच इलाहाबाद बँककडून 352 कोटींचं कर्ज घेतलंय होतं. पण एक वर्ष उलटूनही त्याने बँकेचं कर्ज आणि व्याजही चुकवलं नाही.

_______________________


भ्रष्टाचाराबाबत भारत 81व्या स्थानी




सरकारी कामे करण्यासाठी लाच घेण्याबाबत आणि पत्रकारांच्या सुरक्षितेतेबाबत भारत आशिया खंडातील सर्वात खराब देश असल्याचे ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल संस्थेच्या अहवालात म्हटले आहे. भ्रष्टाचाराच्या बाबत भारताची प्रतिमा अद्याप खराबच असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. 2017च्या यादीत भारताचा क्रमांक  81वा आहे.  सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचाराबाबत या अहवालात 180 देशांचा अभ्यास करण्यात आला आहे. गेल्या वर्षी म्हणजे 2016मध्ये भारताचा 79वा क्रमांक होता. भ्रष्टाचाराविरोधात सर्व देशांना कडक संदेश देण्याच्या उद्देशाने 1995 मध्ये हा निर्देशांक सुरु करण्यात आला होता. एखाद्या देशात किती भ्रष्टाचार होतो हे विश्लेषण, व्यापारी, तज्ञ आणि अनुभवाच्या आधारावर निश्चित केले जाते. 

____________________________


पीएफवरील व्याजदरात घट



कर्मचारी  भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) भविष्य निर्वाह निधीवरील (पीएफ) व्याजदरात घट केली. चालू वर्षासाठी भविष्य निर्वाह निधीवर 8.65 टक्क्यांऐवजी 8.55 टक्के व्याजदर राहणार आहे. या निर्णयामुळे सुमारे सहा कोटी सरकारी नोकरदारांची निराशा झाली आहे. ईपीएफओ मंडळाची आज बैठक झाली. केंद्रीय कामगारमंत्री बंडारू दत्तात्रेय यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. पीएफवरचे व्याजदर घटवून ते 8.55 टक्के करण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता, ज्याला ईपीएफओच्या विश्‍वस्त मंडळाने मंजुरी दिली. पीएफचे व्याजदर कमी करण्याची ही सलग दुसरी वेळ आहे. ईपीएफओने 2016-17 साठी 8.65 टक्के व्याजदराची घोषणा केली होती. 2015-16 साली 8.8 टक्के व्याजदर होता आणि आता ते 2017-18 साठी 8.55 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.

_________________________



2007 गोरखपूर दंगल प्रकरणी योगी आदित्यनाथांना उच्च न्यायालयाचा दिलासा



उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अलाहाबाद उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. 2007 मध्ये उत्तर प्रदेशच्या गोरखपूर येथे झालेल्या दंगलीदरम्यान प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणाची याचिका गुरूवारी उच्च न्यायालयाने फेटाळली. या प्रकरणात गोरखपूरचे तत्कालीन खासदार आणि वर्तमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुख्य आरोपींपैकी एक होते. प्रक्षोभक भाषण केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. पोलिसांच्या तपासात कोणतेही त्रुटी समोर आलेली नाही. त्यामुळे ही मागणी फेटाळून लावत असल्याचे हायकोर्टाने सांगितले.

__________________________


Popular posts from this blog

Top stories on October 2 in a capsule

Top stories on 8 January in a capsule

పాన్‌-ఆధార్‌ లింక్‌కు నెలాఖరే తుది గడువు