१३ डिसेंबरच्या ठळक घडामोडी थोडक्यात
एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. भोसरीतील जमीन खरेदी प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खडसे यांना दिलेल्या क्लीन चिटला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आव्हान दिले आहे. विशेष म्हणजे एकनाथ खडसे यांच्याविरोधातील अंजली दमानिया यांच्यातर्फे अॅड. असीम सरोदे यांनी दाखल केलेला त्रयस्थ अर्जदाराचा हस्तक्षेप अर्ज कोर्टाने मंजूर केला आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 9 जानेवारीला होणार आहे.गेल्या वर्षी मे 2018 मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एकनाथ खडसे यांना भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणात दिलासा दिला होता. एकनाथ खडसेंवर आरोप सिद्ध न झाल्याचा अहवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिला होता. एसीबीने या प्रकरणाचा अंतिम अहवाल कोर्टात सादर केला होता. जमीन खरेदी प्रकरणात खडसेंमुळे सरकारचे नुकसान झाल्याचा आरोप सिद्ध झाला नाही, असा उल्लेख अहवालात करण्यात आला होता.
***************
आता या राज्यात बलात्कार्यांना 21 दिवसांत फाशी
आंध्र प्रदेश विधानसभेत बलात्काऱ्यांना 21 दिवसांत फाशीची तरतूद असणारं ‘दिशा विधेयक २०१९’ मंजूर करण्यात आलं आहे. या विधेयकात बलात्कार तसेच सामूहिक बलात्काराच्या आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची तरतूद असून 21 दिवसांत खटला पूर्ण करण्यासंबंधी सांगण्यात आले आहे. याआधी आंध्र प्रदेश मंत्रिमंडळाने महिला आणि लहान मुलांशी संबंधित गुन्हेगारांना कडक कारवाई करण्यात यावी यासाठी दोन विधेयक मंजूर केली आहेत.आंध्र प्रदेश दिशा कायद्यांतर्गत बलात्कारसारख्या गंभीर गुन्ह्यात कठोर शिक्षा देण्याची तरतूद आहे. नव्या कायद्यानुसार बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्याचा तपास सात दिवसात पूर्ण करावा लागणार आहे. याशिवाय खटला १४ दिवसांत संपवून एकूण २१ दिवसांत गुन्हेगारांना फासावर लटकवण्याची तरतूद आहे. आंध्र प्रदेश मंत्रिमंडळाने महिला आणि लहान मुलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांसाठी विशेष न्यायालय स्थापन करण्याला मंजुरी दिली आहे. यानुसार, महिला आणि लहान मुलांसंबंधी खटल्यांची सुनावणी करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात न्यायालय उभारलं जाऊ शकतं.
***************
भारतीय संघाच्या या खेळाडूने केला गुपचूप साखरपुडा
भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू एकामागोमाग आपल्या आयुष्याच्या सेकेन्ड इनिंग्सला सुरुवात करत आहेत. यामध्ये विराट-अनुष्का, युवराज-हेजल या जोडप्यांचा समावेश आहे. आता यामध्ये आणखी एका युवा खेळाडूच्या नावाची भर पडली आहे. भारतीय संघातील फिरकी गोलंदाज राहूल चाहर याचा गुरुवारी साखरपुडा पार पडला. २० वर्षीय राहूल हा टीम इंडियाच्या मर्यादित षटकारांचा प्रसिद्ध गोलंदाज दीपक चाहरचा भाऊ आहे. कुटुंबातील सदस्यांसह रोहीतने गुपचुप साखपुडा केला. त्यानंतर त्याने कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करुन चाहत्यांना चकित केले. भाऊ दीपक वेस्ट इंडिजविरुद्ध टी-20 मालिका संपल्यानंतर बुधवारी दाखल झाला. सोशल मीडियावर आपल्या भावाच्या साखरपुड्याबद्दल त्याने आनंद व्यक्त केला. राहुलने वेस्ट इंडिज दौऱ्यातून आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे.
पासपोर्टवर दिसणार कमळाचे चिन्ह?
जगभरात कुठेही प्रवास करण्यासाठी भारतीय असल्याची ओळख मानले जाणा-या पासपोर्टबाबतीत एक महत्त्वपुर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार, आता भारतीय पासपोर्टवर कमळाचे चिन्ह दिसणार आहे. केरळच्या कोझिकोड येथे कमळाचे चिन्ह असलेल्या पासपोर्टचे वाटप करण्यात आले. यानंतर थेट संसदेत हा मुद्दा गाजला. भाजपचे निवडणुक चिन्ह असलेल्या कमळाचा वापर पासपोर्टवर करण्यात आल्यामुळं विरोधकांनी जोरदार टीका केली.
विरोधकांची आक्रमकता पाहून लगेच परराष्ट्र मंत्रालयाने तातडीने याबाबत खुलासा केला आहे. तसेच बनावट पासपोर्ट ओळखता यावेत यासाठी नव्याने देण्यात येणाऱ्या पासपोर्टवर ‘कमळ’ चिन्ह छापण्यात आल्याचे गुरुवारी सरकारच्या वतीने लोकसभेत स्पष्ट करण्यात आले. अन्य राष्ट्रीय चिन्हांचाही वापर करण्यात येणार असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.
विरोधकांची आक्रमकता पाहून लगेच परराष्ट्र मंत्रालयाने तातडीने याबाबत खुलासा केला आहे. तसेच बनावट पासपोर्ट ओळखता यावेत यासाठी नव्याने देण्यात येणाऱ्या पासपोर्टवर ‘कमळ’ चिन्ह छापण्यात आल्याचे गुरुवारी सरकारच्या वतीने लोकसभेत स्पष्ट करण्यात आले. अन्य राष्ट्रीय चिन्हांचाही वापर करण्यात येणार असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.
***************
LPG गॅस धारकांसाठी नवीन सुविधा सुरू
हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनिच्या गॅस ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता ग्राहकांना LPG घेण्यासाठी एजन्सीच्या फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही. तसेच कॅश पेमेंटच्या समस्येलाही दिलासा मिळणार आहे. त्यासाठी लवकरच ग्राहकांच्या घरी सिलिंडर वितरित करण्याच्या इझी गॅस कार्ड ही नवीन प्रक्रिया वापरली जाणार आहे.हिंदुस्तान पेट्रोलियमच्या वतीने आयोजीत करण्यात आलेल्या बैठकीत गॅस एजन्सी चालकांना सुलभ कार्ड चालवण्याचे प्रशिक्षण दिले. या योजनेमुळे गॅस वितरणाच्या वेळी ग्राहकांना एका रुपयाहूनही जास्त पैसे घ्यावे लागणार नाहीत असे कंपनीचे उद्दीष्ट आहे म्हणूनच कार्ड सिस्टम लागू केली जात आहे. आत्तापर्यंत गॅस एजन्सींवर पासबुक वापरली जातात. यावर गॅस सिलिंडरची संख्याही नोंदविली जाते. बुकिंग करुनही ग्राहकांना कित्येक दिवस गॅस मिळत नाही, पण आता बुकिंग सोपे करण्यासाठी इझी गॅस कार्ड सुरु केले जात आहे.
***************
***************





Comments
Post a Comment