जिओ कॅप्सूल : ठळक बातम्या वाचा ५ मिनटात
२०१८ च्या
निवडणुकीत लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदसोबत ‘युती’ करण्याची तयारी
पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांनी सुरु केली असून मुशर्रफ यांनी
हाफिज सईदसोबत निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे म्हटले. मुशर्रफ यांनी हे विधान एका
वृत्तवाहिनीसोबत बोलताना केले. मुशर्रफ यांनी काही दिवसांपूर्वीच आपण
लष्कर-ए-तोयबाचा सर्वात मोठा समर्थक असल्याचे म्हटले होते. पाकिस्तानचे माजी
लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांच्याशी सोमवारी या पाकिस्तानी वृत्तवाहिनीने संवाद
साधला. त्यांना त्यावेळी मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदसोबतच्या
युतीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यांनी या प्रश्नाला उत्तर देताना, आतापर्यंत त्या लोकांशी कोणतीही चर्चा झालेली
नाही. पण युतीचा ते जर भाग होणार असतील, तर मी त्यांचे स्वागत करेन, असे मुशर्रफ
यांनी म्हटले.
___________________________
___________________________
रेल्वेगाड्या, स्थानके तसेच परिसरात घडणाऱ्या विविध गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र अव्वल ठरला
आहे. मागील वर्षभरात राज्य रेल्वे पोलीस (जीआरपी) आणि रेल्वे सुरक्षा दलाने
(आरपीएफ) महाराष्ट्रात तब्बल २ लाख ३१ हजार गुन्ह्यांची नोंद केली आहे. देशातील
इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात रेल्वेशी संबंधित गुन्ह्यांचे प्रमाण २०
टक्के आहे. दरवर्षी या गुन्ह्यांमध्ये वाढच होत असून त्यात चोरीच्या घटनांचे
प्रमाण अधिक आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने (एनसीआरबी) रेल्वेशी संबंधित
गुन्ह्यांची माहिती वार्षिक अहवालात दिली आहे. त्यानुसार मागील वर्षभरात आरपीएफ
आणि जीआरपीने संपूर्ण देशभरात सुमारे ११ लाख ३० हजार गुन्ह्यांची नोंद केली आहे.
त्यामध्ये आरपीएफने नोंदविलेल्या गुन्हे सर्वाधिक १० लाख ६९ हजार एवढे आहेत. मागील
वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण सुमारे १ लाखाने वाढले आहे.
___________________________
___________________________
काँग्रेस
अध्यक्षपदासाठी राहुल गांधी यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी मोदी
यांनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणूक प्रक्रियेवर हल्लाबोल केला. 'औरंगजेब राजवटीबद्दल काँग्रेसचे अभिनंदन' असे म्हणत पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. काँग्रेसमध्ये अद्याप
राजेशाही असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले. 'औरंगजेब राजवटीबद्दल
काँग्रेसचे अभिनंदन करतो. १२५ कोटी जनता ही आमची हायकमांड आहे,' असे म्हणत मोदी यांनी काँग्रेस अध्यक्ष निवडीवरुन टीकाही केली.
___________________________
___________________________
अभिनेते शशी कपूर
यांचे मुंबईत ७९ व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शशी कपूर आजारी होते.
मुंबईतील कोकीलाबेन रुग्णालयामध्ये शशी कपूर यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र
दीर्घ आजारपणानंतर त्यांचे निधन झाले. शशी कपूर हे बॉलीवूडचे पितामह पृथ्वीराज
कपूर यांचे सुपुत्र होते. शशी कपूर यांचे मूळ नाव बलबीर राज कपूर होते. शशी कपूर
यांचे बॉलिवूडमध्ये पदार्पण हे चाईल्ड अॅक्टर म्हणून झाले होते. राज कपूर यांच्या
आवारा आणि आग चित्रपटांमध्ये त्यांनी चाईल्ड अॅक्टर म्हणून काम केलं आहे. भारत
सरकारच्या पद्मभूषण या पुरस्काराने
त्यांना २०११ साली गौरवण्यात आले होते.
तसेच २०१४ साली दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवले होते. त्यांना 3 वेळा राष्ट्रीय
पुरस्कारांवर आपले नाव कोरले.
___________________________
___________________________
टी २० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा
श्रीलंका
संघाविरुद्ध २० डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा
झाली आहे. वनडे मालिकेप्रमाणे याही मालिकेत कर्णधार विराट कोहलीला विश्रांती
देण्यात आली आहे. त्यांच्या जागी रोहित शर्मा संघाचे कर्णधार असतील. या संघात अनेक
तरुण खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. श्रेयस अय्यर, मनीष पांडे, दिनेश कार्तिक,
एमएस धोनी, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, युझवेन्द्र चहल,
दीपक हुडा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, बासिल थंपी आणि
जयदेव उनाडकत यांना संघात संधी देण्यात आली आहे.
___________________________
___________________________



