जिओ कॅप्सूल : ५ मिनटात वाचा ठळक बातम्या थोडक्यात




कर्नल पुरोहित, साध्वीवरील मोक्का हटवला


२००८ मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबईतील विशेष एनआयए कोर्टाने सोमवारी ले. कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा ठाकूर, रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी आणि सुधाकर द्विवेदी अशा ५ जणांवरील मोक्का हटवला. या सर्वांवर आता बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्याखाली आरोप ठेवण्यात येणार आहेत. दरम्यान, कोर्टाने श्यामलाल साहू, शिवनारायण कलसांगरा आणि प्रवीण टाकळकी यांना आरोपमुक्त केले असून अन्य आरोपींची आरोपमुक्त करण्याची विनंती फेटाळून लावली आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी १५ जानेवारी २०१८ रोजी होणार आहे.
__________________


अण्णा हजारेंनी केला थेट मोदींवर वार



भ्रष्टाचारमुक्त भारत निर्मितीचा संकल्प करणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच भ्रष्टाचारास प्रतिबंध करणारा कायदा कमजोर केला. तसेच निवडणुकीत दिलेली आश्‍वासने पाळली नाहीत. त्यामुळे देशातील जनतेचा मोदी सरकारवरील विश्‍वास उडाला आहे. देशातील जनताच आता मन की बातबोलू लागली आहे. विविध राज्यांत घेतलेल्या सभांमध्ये त्याचा प्रत्यय आल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मंगळवारी राळेगणसिद्धीत पत्रकारांशी बोलताना सांगितले. स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी; तसेच लोकपाल व लोकायुक्तांची नियुक्ती करावी, या मागणीसाठी हजारे हे येत्या 23 मार्चपासून नवी दिल्लीमध्ये बेमुदत आंदोलन  करणार आहेत.
__________________


छोटा राजनच्या हत्येचा दाऊदचा कट उधळला



तिहार तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या छोटा राजनची तुरुंगातच हत्या करण्याचा कट अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने आखला होता. दिल्लीतील स्थानिक गुंड नीरज बवानाच्या मदतीने राजनची हत्या करण्याचा दाऊदचा कट होता. अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. तिहार प्रशासनाला या कटाची माहिती मिळताच त्यांनी हा कट उधळून लावल्याचे सूत्रांनी सांगितले. राजनच्या हत्‍येच्या कटातील एका सहकाऱ्याने दारूच्या नशेत या कटाबाबत सांगितल्यामुळे डीकंपनीचा कट उधळला. बवानाचा एक सहकारी नोव्हेंबर महिन्यात तुंरूगातून बाहेर आला आहे. राजनच्या हत्‍येबाबत माहिती मिळाल्‍यानंतर त्‍याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
__________________


जयराम ठाकुर यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ



गुजरातमध्ये सरकार स्‍थापन केल्‍यानंतर आज हिमाचल प्रदेशमध्येही भाजप जयराम ठाकुर यांच्या नेतृत्‍वाखाली सरकारची स्‍थापना केली आहे. जयराम ठाकुर यांनी सोमवारी हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपमधील काही मंत्रीही उपस्थित होते. हिमाचल प्रदेशचे राज्‍यपाल  आचार्य देवव्रत जयराम ठाकुर यांना पद आणि गोपनियतेची शपथ देतील. ९ नोव्हेंबर २०१७ रोजी ६८ जागांसाठी मतदान झाले होते. तर, १८ डिसेंबर रोजी मतमोजणी झाली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये भाजपाने ४४ आणि काँग्रेस २१ जागा जिंकल्‍या आहेत. बहुमतासाठी ३५ जागांची आवश्यकता असून, ४४ जागांवर विजय मिळविल्‍याने भाजपने राज्‍यपालांकडे सरकार स्‍थापनेचा दावा केला आहे. 
__________________


साखर उद्योगासाठी पुढील वर्ष कडू : शरद पवार




देशात आणि राज्यातही पुढील वर्षी ऊस पिकाखालील क्षेत्र प्रचंड आहे. म्हणून साखर उद्योगासाठी पुढील वर्ष हे अडचणीचे असून, कारखान्यांनी आतापासून गाळपाची आखणी करायला हवी; शिवाय कारखान्यांनी खर्चात काटकसर करून कारखाने चालविले पाहिजेत, असा सल्ला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी मंगळवारी येथे दिला. शरद पवार म्हणाले, अंतरानुसार ऊस तोडणी वाहतुकीच्या खर्चाच्या निर्णयामुळे कारखान्याच्या जवळ ऊस असलेल्या शेतकर्‍यांचा वाहतुकीचा खर्च कमी होईल; पण बाहेरून ऊस आणावा लागेल; तरच कारखाने चालणार आहेत. पुढील वर्षी कारखाने जादाऊस उपलब्धतेमुळे लवकर सुरू होतील. कमी ऊस असलेल्या कारखान्यांनी जास्त ऊस असलेल्या कारखान्यांकडील ऊस गाळपासाठी पुढे यायला हवे. त्याचे  योजन आतापासून केले नाही, तर पुढील वर्षी जूनपर्यंत गाळप करण्याची वेळ येऊ शकते.
__________________

Popular posts from this blog

जिओ कॅप्सूल : ५ मिनटात वाचा ठळक बातम्या थोडक्यात

Top stories on 23rd October in a capsule