जिओ कॅप्सूल : ५ मिनटात वाचा ठळक बातम्या थोडक्यात
बॅंक खात्याशी आधार लिंक करण्याची मुदत वाढली
आपला १२ अंकी
आधार क्रमांक बॅंक खात्याशी लिंक करण्याची अंतिम तारीख आता वाढली आहे. याआधी आधार
क्रमांक बॅंक खात्याशी जोडण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर देण्यात आली होती. पण
अनेकांना अजूनही ते शक्य न झाल्याने आता ही तारीख वाढवण्यात आली आहे. ज्यांनी
अजूनही आपल्या बॅंक खात्याशी आधार क्रमांक लिंक केला नाही त्यांच्यासाठी ही दिलासा
देणारी बातमी आहे. बॅंक खात्याशी आधार क्रमांक लिंक करण्याची मुदत वाढवण्यात आली
आहे. आधी ३१ डिसेंबरला ही मुदत देण्यात आली होती. आता ही मुदत ३१ मार्च २०१७
पर्यंत देण्यात आली आहे. सरकारने १३ डिसेंबरला याची घोषणा केली.
______________________
कर्जमाफीच्या आकडेवारीमध्ये तफावत
शेतकरी
कर्जमाफीतील सरकारचा आकड्यांचा घोळ पुन्हा एकदा उघड झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी
दिलेले कर्जमाफीचे आकडे आणि सहकार मंत्र्यांनी दिलेले कर्जमाफीच्या आकड्यांमध्ये
तफावत दिसत आहे. राज्यातील १५ लाख ४२ हजार शेतकर्यांच्या खात्यावर ६ हजार ५००
कोटी रुपये जमा झाल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी 24 नोव्हेंबर आणि 25 नोव्हेंबरला केला होता. मुख्यमंत्र्यांनी याचा उल्लेख २४ नोव्हेंबर रोजी
कोल्हापूरच्या भाषणात तर २५ नोव्हेंबर रोजी ट्विटरवर केला होता. मात्र सहकार
मंत्री सुभाष देशमुख यांनी विधानसभेत लेखी उत्तरात दिलेली माहिती
मुख्यमंत्र्यांच्या माहितीपेक्षा वेगळी असल्याचे आजच्या दिसून आले. ५ डिसेंबरपर्यंत ९ लाख ४३ हजार शेतकर्यांच्या
खात्यात ५ हजार १४२ कोटी रुपये जमा झाल्याची सहकार मंत्र्याची विधानसभेतील लेखी
उत्तरात माहिती देण्यात आली आहे.
______________________
सर्वोच्च न्यायालयाची राज्यातील बैलगाडा शर्यतींवर बंदी कायम
महाराष्ट्रातील
बैलगाडा शर्यतींवर हायकोर्टाने दिलेल्या बंदीच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने
देखील शिक्का मोर्तब केला आहे. पण सरकारला सांस्कृतिक हक्कांसाठी असा कायदा
करण्याचा अधिकार आहे की नाही याबद्दलचा निर्णय घेण्यासाठी हे प्रकरण विस्तारित
खंडपीठाकडे सोपवण्यात आले आहे. हे प्रकरण ८ आठवड्यानंतर खंडपीठाकडे येणार आहे.
महाराष्ट्रातील हजारो बैलगाडी शर्यतप्रेमींची उच्च न्यायालयाच्या निर्णयाला
स्थगिती न मिळाल्याने निराशा झालेली आहे. प्राण्यांना या शर्यतींमध्ये क्रूर
वागणूक दिली जाते असा पेटा संघटनेचा आक्षेप आहे. ५ लाखांचा दंड, ३ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षेची तरतूद
बैलांना क्रूर वागणूक देणाऱ्यास करण्यात आली आहे. पण प्राणीप्रेमींनी या
कायद्याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली, त्यानंतर उच्च न्यायालयाने या शर्यतींवर बंदी घातली.
______________________
संपूर्ण कर्जमाफीपर्यंत सरकारची कोणतीही देणी देऊ नका – शरद पवार
सरकारचे कोणतेही
देणे आम्ही संपूर्ण कर्जमाफी मिळेपर्यंत देणार नाही, वीज बिल भरणार नाही, कर्जफेड करणार नाही, हा निश्चय करा, असे आवाहनही त्यांनी शेतकऱ्यांना केले. सामान्य माणूस व शेतकऱ्यांची
मुस्कटदाबी केली तर जनता सरकार उलथल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. शेतकऱ्यांचा कळवळा असल्याचा आव
आणणाऱ्या पंतप्रधान मोदींना समस्या ऐकून घेण्यास वेळ नाही. उलट लोकांच्या
उद्रेकाचे भावनिक राजकारण ते करत असल्याची टीका पवार यांनी केली. राष्ट्रवादी
काँग्रेसचे नेते शरद पवार नागपुरात काढलेल्या हल्लाबोल मोर्चानंतर जाहीर सभेत बोलत
होते. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यावर अतिशय घाणेरडा आरोप करताना शरम
वाटायला हवी होती, अशा शब्दांत
पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टार्गेट केले.
______________________
पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये मोठी वाढ
जून २०१५ नंतर
मंगळवारी पहिल्यांदाच कच्च्या तेलाच्या दराने प्रतिबॅरल ६५ डॉलरपेक्षा मोठी झेप
घेतली आहे. यापूर्वीच पेट्रोलियम पदार्थांची निर्यात करणार्या देशांच्या संघटनेने
(ओपेक) उत्पादनात कपात केली असताना ब्रिटनची सर्वात मोठी नॉर्थ सी ऑइल पाईपलाईन
अचानक बंद झाली आहे. याचा थेट परिणाम तेलाच्या किंमतीवर झाला आहे. सध्या तेलाच्या
किंमती ३० महिन्यांतील सर्वांत उच्च स्तरावर पोहोचल्या आहेत. यामुळे नजिकच्या
काळात देशामध्ये पेट्रोल, डिझेलच्या किंमती
भडकण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही वर्षात अशा प्रकारची
परिस्थिती पहिल्यांदाच निर्माण झाल्याचे व्यापार्यांचे म्हणणे आहे. सध्या ब्रेंट
कू्रडच्या किंमती वाढून त्या ६५.५९ डॉलर्सवर पोहोचल्या आहेत तर यूएस क्रूडच्याही
किंमती वाढून त्या ५८.४८ डॉलर्सच्या घरात गेल्या आहेत.
______________________




