जिओ कॅप्सूल : ५ मिनटात वाचा ठळक बातम्या थोडक्यात
राहुल गांधी काँग्रेसचे नवे अध्यक्ष
काँग्रेसचे
उपाध्यक्ष राहुल गांधी यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. 16 डिसेंबरला राहुल गांधी अध्यक्षपदाचा पदभार
स्वीकारणार आहेत. काँग्रेसचे जेष्ठ नेते मुल्लापल्ली राजचंद्रन यांनी याबाबत घोषणा
केली. या पदासाठी अर्ज दाखल करण्याची
सोमवार अखेरचा दिवस होता. राहुल यांच्या वतीने आतापर्यंत 89 अर्ज दाखल झाले होते. 16 डिसेंबर रोजी राहुल यांना पक्षाध्यक्षपदाचे प्रमाणपत्र
सोनिया गांधी आणि काँग्रेसच्या इतर वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत दिले जाईल.
गेल्या आठवड्यात राहुल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. राहुल यांना
पक्षाध्यक्षपद देण्याचे गेल्या महिन्यात निश्चित करण्यात आले होते. राहुल गांधी
यांची अध्यक्षपदी निवड झाल्याने 19 वर्षानंतर
काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळाला आहे. 1998 साली काँग्रेस अध्यक्षपदाची सुत्रे सोनिया गांधी यांनी घेतली होती.
__________________________
राज्यातील आरटीओने व्हीआयपी नंबर विक्रीतून कमावले ७७ कोटी
दुचाकी आणि
चारचाकी वाहनांच्या व्हीआयपी नंबरसाठी अनेक हौशी लोक लाखो रुपये मोजत असल्याचे
समोर आले असून गेल्या ८ महिन्यात राज्यभरात आरटीओला व्हीआयपी नंबरच्या मागणीतून
तब्बल ७७ कोटींच उत्पन्न मिळाले आहे. पुणे व्हीआयपी नंबर्सच्या मागणीत राज्यात
अग्रेरस असून, ३० हजार ३६६
व्हीआयपी नंबर्सच्या विक्रीतून पुणे आरटीओने जवळपास २३ कोटींचे उत्पन्न मिळवले
आहे. त्यापाठोपाठ नाशिक आरटीओने १९ कोटी, ठाणे आरटीओने १० कोटी, कोल्हापूर
आरटीओने ७ कोटींचे उत्पन्न कमावले आहे. तर ६ हजार ६५२ वाहनांच्या व्हीआयपी
नंबर्सची विक्री मुंबईतल्या अंधेरी, बोरीवली, वडाळा आणि ताडदेव
आरटीओने केली असून, त्यातून जवळपास ६
कोटींची कमाई केली आहे. चारचाकी वाहनासाठी १ हा नंबर सर्वाधिक १२ लाख रुपयांना
विकला गेला असल्याची माहिती आरटीओने दिली आहे.
__________________________
खासदार सुप्रिया सुळे यांना अटक
नागपूर विमानतळ
रोडवर सोमवारी राष्ट्रवादीच्या
कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली 'चक्का जाम आंदोलन 'केले. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह कार्यकर्त्यांना चक्का
जाम आंदोलन करताना पोलिसांनी अटक केली. चक्का जाम आंदोलनात कार्यकर्त्यांनी ‘नही चलेंगी, नही चलेंगी, तानाशाही नही
चलेंगी आणि हल्लाबोलच्या घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. यावेळी यावेळी पोलिसांनी
सुप्रिया सुळे यांच्यासह इतर नेत्यांना, कार्यकर्त्याना ताब्यात घेतले व नंतर सोडून दिले. नागपूर येथे सोमवार पासून
हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. भाजपसरकारच्या शेतकर्यांविषयीच्या हलगर्जीपणा
विरोधात हे आंदोलन छेडण्यात आले होते. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी
केंद्रीय मंत्री शरद पवार नागपुरात आंदोलन करणार आहेत.
__________________________
१० वर्षांमध्ये ४७ टक्के विधेयके चर्चेविनाच मंजूर
गेल्या १० वर्षात
म्हणजे भाजप आणि काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात ४७ टक्के विधेयके चर्चेशिवाय मंजूर
झाली आहेत. तर ३१ टक्के विधेयके कोणत्याही स्थायी किंवा सल्लागार समिती शिवाय
विशेष छाननी, परीक्षण न करता
मंजूर करण्यात आली आहेत. भारतीय राज्यघटनेनुसार लोकप्रतिनिधीनीं विधेयके सखोल
चर्चा, बैठका घेऊन मंजूर करणे
अपेक्षित आहे. राज्यघटनेतील या संकेताला सध्या तिलांजली दिली जात असल्याचे दिसून
येत आहे. गेल्या २० वर्षात संसदेत निवडून आलेले लोकप्रतिनिधी उच्चशिक्षित आहेत.
जवळपास ६२ टक्के प्रतिनिधी पदवी, पदव्युत्तर आणि
डॉक्टरेटची डिग्री मिळवलेले आहेत. मात्र, त्यांचा प्रत्यक्ष काम करण्याचा वेळ कमी होत चालला आहे. कामाचे दिवस कमी झाले
असले तरी गेल्या पाच वर्षात खासदारांच्या पगारात चारवेळा वाढ झाली आहे.
__________________________
अनुष्का आणि विराट कोहली अडकले विवाहबंधनात
बॉलीवूड
अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेटसंघाचा कर्णधार विराट कोहली हे सोमवारी
अखेर विवाहबंधनात अडकले. इटलीत बोर्गो फिनोचितो हाॅटेलमध्ये त्यांचा विवाह सोहळा
संपन्न झाला. लग्न सोहळ्यामध्ये दोन्ही कुटुंबीयांंच्या जवळच्या व्यक्ती आणि मित्र
परिवार हजर होते. बऱ्याच दिवसांपासून
देशभरात सुरु होती मात्र दोघांनी लग्नाबाबतचे गुपित चांगलेच राखले होते. या
लग्नसोहळ्याला उपस्थित असलेल्या प्रत्येकाकडून गुप्तता राखण्याचा फाॅर्म साईन करून
घेतला. अगदी कॅटरिंगवाल्यांकडूनही. त्यांनाही तंबी दिली गेली की कुणी काही बाहेर
बोललं तर काँट्रॅक्ट रद्द करण्यात येईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा सोहळा
१५ डिसेंबर पर्यंत इटलीत रंगणार असून २१ डिसेंबर रोजी मुंबई मध्ये लग्नाचे
रिसेप्शन होणार आहे.
__________________________


