ठळक बातम्या वाचा ५ मिनटात

बँक आणि शासनाच्या भांडणात शेतकऱ्यांचे मरण


महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी मध्ये आता बँक आणि शासनाची एकमेकांना दोष देण्याचे खेळ सुरु आहेत. महाराष्ट्र सरकार प्रमाणे बँकांनी अनेक अर्जांमध्ये १२३१२३१२३ अशा प्रकारचे खोटे आधार नंबर टाकून फसवणुकीचा प्रयत्न केला आहे. तर बँकांकडून याबाबतची वास्तवस्थिती सरकार गृहीत धरत नसल्याचा आरोप होत आहे. बँकांप्रमाणे अनेक शेतकऱ्यांनी आपला आधार नंबर दिला नसून कर्जमाफीचा ६० कोष्टांचा फॉर्म आधार नंबर नसताना पुढेच जात नव्हता. त्यामुळे त्यांनी फॉर्म पुढे जाण्याच्या उद्दीष्टाणे एकाच प्रकारचे अंक टाकून फॉर्म सबमिट केला. १२३१२३१२३ अशा प्रकारचेच जास्त करून नंबर असल्याने ही फसवणूक नसून उपाय काढल्याचे बँकांचे म्हणणे आहे. या दोघांच्या भांडणात बळीराजा मात्र नक्कीच फसला आहे. कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर सरकारी आकडेवारीनुसार जुलै ते ऑक्टोबर या काळात 1,020 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

____________________

४ वर्षांच्या मुलाने केला लैंगिक अत्याचार


दिल्लीतील द्वारका परिसरातील एका चार वर्षांच्या मुलाविरोधात त्याच्याच वर्गमैत्रिणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलीच्या आईने मुलाला शाळेतून काढून टाकावे, अशी मागणी केली असून पोलिसांनी याप्रकरणात आता समुपदेशकांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी द्वारका परिसरातील शाळेत शिकणाऱ्या चार वर्षांच्या मुलीने तिच्या आईकडे पोटदुखीची तक्रार केली. मुलगी सुरुवातीला सहज म्हणत असावे असे तिच्या आईला वाटले. पण मुलगी दोन दिवसांनी वेदनेने विव्हळत होती, रडत होती. शेवटी मुलीला नेमके काय होत आहे ते आईने विचारले असता आपल्या वर्गातील एका मुलाने स्वच्छतागृहात टोकदार पेन्सील ने तिच्या गुप्तांगाला इजा केली असल्याचे सांगितले. मुलीवर हा प्रसंग शाळा प्रशासन, शिक्षक यांच्या निष्काळजीपणामुळेच ओढावल्याचा आरोप पीडितेच्या आईने केला आहे.
___________________

काळ्या पैशांच्या टॉप १० मध्ये छगन भुजबळ


एन्फोर्समेंट डायरेकटोरेट ने भारतातील काळ्या पैशांच्या हेरफेर प्रकारणांमधले टॉप १० केस ची यादी नुकतीच जाहीर केली. या यादी मध्ये अनेक उद्योजकांबरोबर नेते मंडळी व त्यांनी स्थापित केलेल्या शेल कंपन्यांचीही नाव आहेत. नेत्यांच्या या यादी मध्ये व्हायएसआर काँग्रेसचे जगनमोहन रेड्डी यांच्या ३१ शेल कंपन्यांच्या माध्यमातून केलेल्या ३६८ कोटी रुपयांच्या काळ्या पैशांच्या हेराफ़ेरीचा उल्लेख आहे. तसेच महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व माजी मुख्य मंत्री छगन भुजबळ यांनी ८१ शेल कंपन्यांच्या माध्यमातून केलेल्या २०० कोटी काळ्या पैशांच्या हेराफ़ेरीचा देखिल उल्लेख आहे. या हेराफेरीतून छगन भुजबळ यांनी या यादीत १० वे स्थान मिळविले आहे.

_______________________

शेतकऱ्यांना आता प्रिस्क्रिप्शन देऊन मिळणार कीटकनाशके


यवतमाळमध्ये कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा होऊन जवळ जवळ ५० शेतकऱ्यांनी आपले प्राण गमावले होते तर ७०० हुन अधिक शेतकऱ्यांना बाधा झाली होती. अनेकांनी कायमस्वरूपी आपली दृष्टी गमावली. या प्रकरणानंतर कीटकनाशक कंपन्यांवर गुन्हे दाखल झाले होते मात्र पुढे असा प्रकार घडू नये याची खात्री घेण्याच्या उद्देशाने आता महाराष्ट्र शासन कीटकनाशक घेताना शेतकऱ्यांना कृषी अधिकाऱ्याकडून प्रिस्क्रिप्शन घेण्याचा नियम लागू करणार आहे. कोणतेही कीटकनाशक घेताना शेतकऱ्यांना कृषी अधिकारी त्यांच्या सही आणि शिक्क्याची लिहून चिट्ठी देतील व ती चिट्ठी दाखविल्यानंतरच आता शेतकरी कीटकनाशक घेऊ शकतील. यामुळे अवैध व हानिकारक कीटकनाशकांचा उपयोग यापुढे होणार नसल्याचा अंदाज शासनाने लावला आहे.




Popular posts from this blog

जिओ कॅप्सूल : ५ मिनटात वाचा ठळक बातम्या थोडक्यात

Top stories on 23rd October in a capsule